*कडवे सत्य*

*कडवे सत्य*

*नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा* ,
*व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी* , 
*घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं* ,

*एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहण्यात मजाआहे* .
*वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही* ,

*गावात राहणाऱ्याला वाटतं* *शहरात मजा आहे* ,
*शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे* ,

*देशात राहतात त्यांना वाटतं* *परदेशी जावं* ,
*परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो* ,

*केस सरळ असणारी म्हणते* *कुरळे किती छान* ,
*कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता*.

*प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे  प्रेम मिळावे म्हणुन जंग जंग पछाडतो.पण प्रेम मिळत नाही म्हणुन प्रेमांच्या जगात जगा*

*एक मूल असतं त्याला वाटतं*  *दोन असती तर* ,
*दोन असणाऱ्याला वाटतं , एक वाला मजेत*,

*मुलगी असली की , वाटतं* 
*मुलगा हवा होता* ,
*मुलगा असला की वाटतं* *मुलीला माया असते* .

*ज्याला मूल नसतं , तो म्हणतो* *काहीही चालेल*,

*नावे ठेवणारे रामातही दोष बघतात* ,
*कौतुक करणारे *रावणाचीही स्तुती करतात* .

*मिळून काय *?*
*नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही* .
*मी बरोबर आहे , पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे* , *तरी मजेत आहे* .

*किती गोंधळ रे देवा हा?*

*म्हणुन जे आहे ते स्विकार करा आणि आयुष्य आनंदात जगा आयुष्य खुप सुदंर आहे जगता आले पाहिजे...*

   *आपला माणुस* 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४