इतिहासात हरवलेली एक साहसी वीरांगना* - राणी द्रौपदी बाई
*इतिहासात हरवलेली एक साहसी वीरांगना* - राणी द्रौपदी बाई
देशाच्या रक्षणात, प्रगती मध्ये अग्रेसर असणारे, पानिपतच्या युद्धामध्ये महत्वाची भूमिका साकारणारे धार पवार हे ९६ कुळी मराठा घराणे हे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामामध्येही मागे नाही राहिले . तर चला जाणून घेऊ धार
राणी द्रोपदी बाई पवार (धार ...
पवार घराण्यामधील वीरांगना राणी द्रौपदी बाई पवार यांच्या विषयी.
धार क्षेत्रामधील झालेल्या स्वातंत्र्य क्रांतीमधील सूत्रधार म्हणजे राणी द्रौपदी बाई या होत्या. त्यांनी आपल्या कार्यामधून दाखवून दिले होते कि प्रत्येक भारतीय नारी मध्ये दुर्गा रणचंडी यांचे रक्त वाहते.
त्या काळामध्ये धार राज्य हे तुलनेने छोटे राज्य होते. २२ मे १८५७ रोजी धार च्या राजांचे देहावसान झाले. त्यांच्या मरण्याच्या एकच दिवस आधी त्यांनी आनंदराव या बालकाला दत्तक घेतले होते. राजांची मोठी राणी या नात्याने द्रौपदी बाई यांनी राज्यकारभार हातात
धार पवार
घेऊन सांभाळायला सुरुवात केली कारण आनंदराव अजून बालक होते. पण झाले असे कि अन्य राजवंशाच्या विरुद्ध इंग्रजांनी अल्पवयीन असून आनंदराव यांना धार चे राजा म्हणून मान्यता दिली. याच्या मागील कारण असे कि ज्या काही क्रांतिकाऱ्यांनी क्रांतिकारी चळवळ चालू केली होती तीच चळवळ धार
राज्यामध्ये चालू होऊन ते सर्वांचे केंद्र बानू नये असे इंग्रजांना वाटत होते. परंतु हा इंग्रजांचा डाव राणी द्रौपदी यांना समजून आलेला होता त्यामुळे राणी द्रोपदी यांच्या मध्ये क्रांतीची प्रचंड ज्वाला पेटलेली होती. त्यांनी राज्याचा कारभार हाती घेताच ती क्रांतीची आग संपूर्ण
प्रदेशामध्ये पसरली गेली. द्रौपदी बाई यांनी रामचंद्र बापूजी यांना दिवाण म्हणून नियुक्त केले ज्यांनी त्यांची शेवटपर्यंत साथ दिली (राणीचे भाऊ भीमराव भोसले हे सुद्धा देशभक्त होते). सन १८५७ मध्ये राणी द्रोपदी यांनी ब्रिटिशांना विरोध करणाऱ्या सर्व क्रांतिकाऱ्यांना पाठिंबा जाहीर
केला आणि इंग्रजांबरोबर लढण्यासाठी सेनेमध्ये अफगाणी सैनिक नियुक्त केले जे कि इंग्रजांना आवडले नाही. परंतु इंग्रजांना राणीची वीरता आणि साहस माहिती होते त्यामुळे त्यांनी खुला विरोध केला नाही. यानंतर धार च्या सैनिकांनी अमझेरा राज्याच्या सैनिकांना बरोबर घेऊन सरदार पूर वर आक्रमण
केले. राणीचे भाऊ भीमराव भोसले यांनीहि क्रांतिकार्यांचे स्वागत केले आणि लुटून मिळालेल्या ३ तोफा या राणीने स्वतःच्या राजमहालामध्ये ठेवल्या. ३१ ऑगस्ट रोजी क्रांतिकाऱ्यांनी धार च्या किल्यावर आक्रमण करून पूर्ण अधिकार प्राप्त केला आणि राणी त्यांना पाठिंबा देत राहिली. हे सर्व
पाहून इंग्रजांचा कर्नल ड्युरेन्ड हा भडकून उठला आणि त्याने राणीला चेतावणी दिली जे काही होईल त्यामध्ये दोषी राणी असेल परंतु राणी अशा गोष्टीनी घाबरून जाईल तर ती राणी कसली. स्वतः राणी इंग्रजांना घाबरत नाही हे पाहून आजूबाजूंच्या प्रदेशांमधील लोकांमध्ये क्रांतीची, स्वातंत्र्याची
चिंगारी पेटली.अनेक क्रांतिकारी राणीकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये काम करू लागले. नानासाहेब पण त्या वेळी तिथेच ठाण मांडून बसलेले होते. नानासाहेब आणि राणी द्रोपदी यांनी इंग्रजांना खूप त्रास दिला होता. राणीच्या मदतीने क्रांतिकाऱ्यांनी अनेक वेळा त्यांचे पत्रे लुटली
होती, त्यांची घरे जाळून टाकली होती. हे सर्व पाहता इंग्रजांना त्यांच्या वर भविष्यात येणाऱ्या संकटाची जाणीव झाली त्यामुळे इंग्रजांनी २२ आक्टोबर १८५७ रोजी धार च्या किल्याला सर्व बाजूंनी वेढा घातला. लाल दगडांनी बनलेला, ३० फूट उंच भिंत असलेला असा हा धार चा किल्ला होता.
इंग्रजांना वाटले कि वेढा दिला कि लगेच किल्ला आपल्या हातात येईल आणि सर्व काही ठीक होईल. परंतु असे न होता हे युद्ध २४ तारखेपासून ते ३० तारखेपर्यंत चालले. इतके दिवस प्रयत्न केल्यानंतर इंग्रजांना किल्याच्या भिंतीला छेद करण्यात यश मिळाले आणि त्या नंतर सर्व इंग्रज किल्ल्यामध्ये
घुसले. परंतु इंग्रजांच्या हाती एकही क्रांतिकारी लागला नाही. राणी द्रौपदी ने आधीच सर्व क्रांतिकार्यांना गुप्त रस्त्याने इथून बाहेर काढले होते. हा सर्व प्रकार पाहून इंग्रज अधिकाऱ्याला प्रचंड राग आला, त्याने धार चा किल्ला उध्वस्त करून टाकला. नंतर इंग्रजांनी रामचंद्र बापू
यांनाच दिवाण केले आणि अल्पवयीन आनंदराव पवार यांना राजा घोषित केले. या नंतरही राणी द्रोपदी बाई क्रांतिकार्याना प्रेरणा देत राहिली आणि मोठ्या साहसाने पुढचे काही वर्षे ब्रिटिशांविरोधात लढा चालू ठेवला. राणी द्रौपदी बाई च्या मृत्यूविषयी काही माहिती उपलब्ध नाही.
Comments
Post a Comment