५ फेब्रुवारी१६६४ रोजी नारो बापूजी मुदगल” यांचे बलिदान.

इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीर *५ फेब्रुवारी १६६४ रोजी* , “नारो बापूजी मुदगल” यांचे बलिदान....🙏🚩

६ जानेवारी ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत वसूल बाद्शःची सुरत बतसुरत झाली सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले शहाजीराजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले...

लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला.. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारो बापूजी मुदगल सरसावला नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र...

वडगावजवळ नारो बापुजींच्या आणि मुकुंद सिंहाच्या सैन्याचा सामना झाला मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले तो *दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४....* 

――――――――――――
वीर सेनानी नारो बापूजी मुदगल ह्यांच्या बलिदानास विनम्र अभिवादन.....🙏🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४