*एकादशी*
एकादशी*
* एक वर्षात बारा महिने
* दर तीन वर्षांतून एकदा अधिक महिना येतो.
* प्रत्येक महिन्यात तीस तिथी.
* पंधरा तिथींचा एक पंधरवडा
असे दोन पंधरवडे असतात.
* पहिल्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष,
* दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष
* प्रतिपदा ते पौर्णिमा अशी शुक्ल पक्ष
* प्रतिपदा ते अमावस्या कृष्ण पक्षाची रचना असते.
एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पक्षांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादशी येतात, तर संपूर्ण वर्षभरामध्ये २४ एकादश्या येतात. अधिक महिना असल्यास त्याच्या दोन एकादशींचा यात भर पडतो.
या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र स्थान ,महात्म्य आणि नाव आहे.
२४ एकादशींची नावे
हि नावे महिन्यानुसार पुढे दिली आहेत.
चैत्र - कामदा, वरूथिनी
वैशाख - मोहिनी, अपरा
ज्येष्ठ - निर्जला, योगिनी
आषाढ - शयनी, कामिका
श्रावण - पुत्रदा, अजा
भाद्रपद - परिवर्तिनी, इंदिरा
आश्विन - पाशांकुशा, रमा
कार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती
मार्गशीर्ष - मोक्षदा, सफला
पौष - पुत्रदा, षट्तिला
माघ - जया, विजया
फाल्गुन - आमलकी, पापमोचनी
अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो.
वारकरी संप्रदाय मुळातच वैष्णव संप्रदाय असल्याने आणि विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण यांना मानत असल्याने गुरु परंपरा, नामसंकीर्तन,सगुण भक्ती तुन निर्गुण कडे वाटचाल करणारे अशी भागवतात मांडलेली तत्वे जशीच्या तशी मानतात म्हणून ते भागवत धर्म( कर्तव्य) पाळतात म्हणून भागवत धर्म आणि भागवत एकादशी चे व्रत करतात.
हे हिंदू धर्म ग्रंथ साहित्य अगदी अनादी कालापासून आतापर्यंत आपल्याकडे आले ते दोन स्वरूपात एक श्रुती म्हणजे एक गुरूकडून आपल्या शिष्याकडे तोंडी पाठांतर करून वेद, उपनिषद वगैरे आणि दुसरे ऋषी मुनींनी त्यांच्या स्मृती लिहून ठेवल्या ते साहित्य. अठरा पुराणे वगैरे.तर अशा स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात.
एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्तआणि भागवत अश्या दोन्हीही एकादशी दोन वेगळ्या म्हणजेच एका मागोमाग दिवशी येतात.
आपण सूर्योदयाला असणारी तिथी मानतो.त्याचप्रमाणे
१. जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो, आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्यादिवशी एकादशीचा क्षय असतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे समजतात.
२. जर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
३. द्वादशी जर दोन दिवसात असतील तर पहिली द्वादशी म्हणजे भागवत एकादशी आणि त्याआधीची तिथी म्हणजे स्मार्त एकादशी.
४. वरील अपवाद वगळता जर एकादशी एकाच दिवशी आल्यास दोन्ही वैष्णव या व्रताचे पालन त्यादिवशी करतात.
!! राम कृष्ण हरी!!
वैदिक सनातन धर्मात दोन प्रकारचे धार्मिक वांकमय आहे. श्रुती आणि स्मृती.
श्रुती म्हणजे वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, अरण्यके
स्मृती म्हणजे वेदांग, षददर्शने, आणि उपवेद
यापैकी जे लोक (पूर्व काळी ब्राह्मण) स्मृती तत्वज्ञान, जे काहीसे कर्मठ आणि उदारमतवादी आहे, याचे अनुयायी आहेत त्यांना स्मार्त म्हणतात.
आता एकादशी. एकादशी चे दोन प्रकार असतात. भागवत आणि स्मार्त. स्मार्त एकादशी वरीलप्रमाणे स्मार्त तत्वज्ञानावर आधारित आहे. भागवत एकादशी भागवत धर्म म्हणजे वारकरी, गौडिय, पुष्टीमार्ग, असे वैष्णवांचे अनेक जे भक्ती संप्रदाय आहेत ते मानतात. भागवत धर्माचा आधारच भक्ती आहे, पुराणे आहेत. त्यामुळे एकादशीचे व्रत पालन करण्याच्या पद्धती भिन्न आहेत.
आता मोहिनी कुठून आले?
या दोन एकादशीनमध्ये फरक कळवा, म्हणून स्मार्त एकादशीला भगवान विष्णू शी संबंधित एखादे नाव दिले जाते. प्रत्येक महिन्याचे नाव वेगळे असते. मोहिनी स्मार्त एकादशी ही वैशाख शुक्लपक्षातील एकादशी आहे. भागवत एकादशीला नाव नसते.
कधीकधी एका पक्षात दोन एकदशा येतात. अशावेळी आधी येणारी स्मार्त असते, व तिला नाव असते. दुसऱ्यादिवशी भागवत एकादशी असते.
प्रत्येक महिनायत दोन म्हणजे ववर्षात 24 एकादशी येतात. चैत्रापासून फाल्गुन पर्यंत शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी.
तर कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया.
संदर्भ: Bhagwat Ekadashi 2019: भागवत एकादशी निमित्त जाणून घ्या पूजाविधी आणि एकादशी व्रताचे महत
Comments
Post a Comment