दिल्ली चेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा.दि. १० फेब्रुवारीला मराठ्यांनी जरीपटका फडकवत केली दिल्ली काबीज !! हिंदुस्थान वर मराठेशाहीची वचक निर्माण करणाऱ्या दिल्लिदिग्विजयविर महादजी शिंदे यांना मानाचा मुजरा.. 🚩🚩

मराठ्यांनी जरीपटका फडकवत केली दिल्ली काबीज !!

होय दिल्लीचा बादशहा शहाआलम अलाहाबाद येथे हद्दपारीचे जिणे जगत असताना त्याचा संबंध मराठ्यांशी आला.

त्याला ही माहिती होत उभ्या हिंदुस्थानामध्ये फक्त मराठे च आपली मदत करू शकतील.

म्हूणनच त्याने मराठ्यांची मदत मागण्याचे ठरवले.
शहाअलमने दि. २० डिसेंबर १७७० रोजी आपला वकील सैफुद्दिन महमदखान याला मराठ्यांकडे पाठवून दिल्लीस जाण्याचे बाबतीत त्यांची सशस्त्र मदत, महादजी शिंदे याच्याकडे मागितली.

 दुसरी बाजू म्हणजे 
नजीबउद्दौला नुकताच मरण पावला होता. त्यामुळे मराठ्यांच्या मदतीने आपण दिल्लीच्या तख्तावर आरूढ होऊ शकू, अशी उमेद बादशहा बाळगून होता.

त्याचा वारस जवानबख्त व मुलाची आई झीनत महाल ही दिल्लीतच होती.
दिल्लीच्या संरक्षणासाठी झबिताखानाचे ३,००० सैनिक सुसज्ज होते.
नजीबचा मृत्यू झाल्याने दिल्लीशासनावर नियंत्रण ठेवणारी किल्ली मराठ्यांच्याच हातात होती.असं म्हणायला काही हरकत नव्हती.


आपल्या स्वतःच्या मुलुखातील खरकटी निस्तरण्यात गर्क झालेला अहमदशहा मृत्युपंथाला लागला होता.

 झबितखान हा अननुभवी तरुण तर दुंदीखान अर्धांग झाल्याने विकलागंअवस्थेत असलेला.शहाअलम व त्याच्या गोटातील मुत्सद्दी साथीदार चिंतामग्न  झाले होते.
आत्ता दिल्लीच चालक मालक मराठे कोणास करणार यावर सर्वच लक्ष्य लागून होत.

👉 मीरबक्षीपद आणि बादशाहीसुद्धा मराठे कोणाला देतील, याचा त्यांना काहीच अंदाज लागेना.

तिसरी बाजू

याचं दरम्यान महादजी शिंदे यांनी शहाअलमला एक गुप्त खलिता पाठविला आणि जर बादशाहा सर्व खर्च देणार असेल, तर त्याला दिल्लीला सुखरूप नेऊन तक्तावर बसविण्यास आपण तयार आहोत असे कळविले.

 बादशहाने उत्तरादाखल अलाहाबादहून सैफुद्दिन महमदलाच मराठ्यांच्या गोटात पाठवून दिले. अखेर सौदा ठरला.

 तरी दरम्यानच्या काळात बादशहाचा कट्टा दुष्मन गाझीउद्दिन याला महादजी शिंदे यांनी अजमेरहून आपल्याकडे बोलावून घेतल्याने बादशहाच्या मनात संदेह निर्माण झाला होताच. परंतु महादजी नी परस्थिती व्यवस्थित हाताळली.

२७ जानेवारी १७७१ रोजी फरुकाबादचा तळ हलवून  पुढाकार घेणारे मराठा सैन्य मणिपुरी, शुकोबाद आणि अलीगढमार्गे ५ फेब्रुवारी १७७१ रोजी दिल्ली समोर असलेल्या पतपारगंजास येऊन थडकले होतं . येताना वाटेत त्यांनी सिकंदराबाद येथे लुटालूट व जाळपोळ केली.


७ फेब्रुवारी रोजी सैफुद्दिन मराठ्यांच्या छावणीतून निघाला, यमुना नदी पार करून गेला, राजधानीचा दिल्ली दरवाजा उघडण्यास त्याने तेथील सैनिकांना भाग पाडले. मराठ्यांपासून कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही, अशी दिल्लीतील नागरिकांना त्याने हमी दिली. मग तो जामा मशिदीत गेला त्यावेळी झबिताखानच्या हुकुमाप्रमाणे बलुचचा भाऊ मुसावीखान हा दिल्लीचा प्रमुख होता. त्याला बादशहाच्या नावे द्वाही फिरविण्यास भाग पाडले व किल्ल्याचा ताबा मागितला. किल्ल्यावर किल्लेदार म्हणून झबिताने कासीमअलीची नेमणूक केली होती त्याने किल्ल्याचा ताबा द्यायचे नाकारले व स्वसंरक्षणार्थ किल्ल्याच्या तटावरून तोफांचा मारा करावयास सुरुवात केली. पण या निर्णायकी प्रतिकारामुळे बालेकिल्ल्याचे संरक्षण होऊ शकले नाही. 

मराठ्यांच्या तोफांनी अल्पकाळच भडिमार केला पण त्यामुळे असद बुरुजाला खिंडार पडले. किल्लेदार नाक मुठीत धरून शरण आला.


९ फेब्रुवारी १७७१ रोजी कसलीही गडबड न करता त्याने शरणागतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या व संपूर्ण शरणागती पत्करली.

दि. १० फेब्रुवारीला अगदी उषःकालीच महादजी शिंदे वतीने यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद याने मोठ्या प्रतिष्ठेने किल्ल्यात प्रवेश केला, किल्ल्याच्या तटबंदीचे संरक्षणासाठी आपल्या सैनिकांची नेमणूक केली व झबिताखानच्या सैन्याला किल्ल्याबाहेर हाकलून दिले.

 पाच हजार मराठा स्वारांनी दिल्ली शहर व्यापून टाकले...

1771 मध्ये शाह आलम II सोबत दिल्लीला गेल्यानंतर, त्याने दिल्लीत मुघलांचा पुनर्स्थापना केली आणि वकील-उल-मुतलक (साम्राज्याचा रीजेंट) बनलले '. महादजी शिंदे यांचे प्रमुख सल्लागार सर्व शेणवी होते. त्यात मथुरेतील जाटांची सत्ता नष्ट केली आणि 1772-73 दरम्यान रोहिलखंडमधील पश्तून रोहिल्ल्यांची सत्ता नष्ट केली आणि नजीबाबाद ताब्यात घेतला.


1788 मध्ये गुलाम कादिर या रोहिला सरदारासोबत मिळून महमूद शाह बहादूरने शाह आलमला हटवले आणि स्वतःलाच दिल्लीचा बादशाह घोषित केले.



महादजी शिंदेना कळताच त्यांनी दिल्ली गाठले. रोहिल्यांचे बंड मोडून काढले आणि पुन्हा शाह आलमला परत दिल्लीच्या तख्तावर बसवले. ही काय साधी गोष्ट नव्हती. त्या काळातील सर्वात प्रभावी सेनापती मध्ये  महादजी शिंदे यांचे नाव अग्रस्थानी आहे.

 तेव्हापासून मराठा साम्राज्याला आव्हान देणारा भारतात कुणीच उरला नाही.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम अवघड व मोठं कार्य केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

मुगल ब्रिटिश जाट रोहिले पठाण राजपूत आदी शाह्यांना
मराठ्यांनी नमवत,पानिपत युद्धात झालेली हानी व प्रत प्रतिष्ठा दिल्लीवर भगवा फडकावून माघारी मिळवली...
तो दिवस दिल्लीविजय दिवस..!



   लेखन व माहिती संकलन :-नितीन घाडगे    

संदर्भ - जदुनाथ सरकार, मोगल साम्राज्याचा ऱ्हास भाग ३
महादजी शिंदे याची विविध पुस्तकं सदर्भ 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४