समरभुमी उंबरखिंडीचा इतिहास"⚔️🚩
🚩⚔️"समरभुमी उंबरखिंडीचा इतिहास"⚔️🚩
२ फेब्रुवारी १६६१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्तलबखान उझबेगी, स्त्री सरदार रायबागन व तीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठीकाणी पराभव केला.
खान कोकण काबीज करण्यासाठी अंबेनाळ उंबरखिंड मार्गे उतरणार हे महाराजांना समजताच त्यांनी स्वराज्याचे सेनापती नेताजीराव पालकरांना पुढे जाऊन छावणी टाकण्यास सांगीतले.
स्वराज्याचे सैन्य उंबरखिंडच्या मार्गात दबा धरून बसले होते. खानाचे सैन्य उंबरखिंडीत उतरते ना उतरते तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या सैन्यावर हल्ला चढवीला.
एका बाजुने नेताजीराव पालकर दुसर्या बाजूने स्वतः शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाच्या सैन्याची पार दाणादाण उडाली. खानास माघार घ्यावी लागली, या लढाईची वैशिष्ट्ये अशी की, कमी सैन्याने प्रचंड शत्रुचा गनिमीकाव्याने पराभव केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः महत्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता त्यापैकी ही एक लढाई
Comments
Post a Comment