आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६७६ 
(फाल्गुन वद्य ९, नवमी, शके १५९७, संवत्सर, राक्षस, वार रविवार)

महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर! 
          महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले. सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे पुढील ३/४, महीने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जद याने अथणी भुईसपाट केली व बेळगावात अदिलशाहाची मुजोरी मोडून काढली!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७१९
लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले.  रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७३१
छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७४०
नासिरजंग हा निजाम उल्मुल्काच्या सहा पुत्रांपैकी एक पुत्र. तो सर्व मुलात हुशार व पराक्रमी होता. भोपाळवर निजामाचा कोंडमारा होत असता त्याने लढाईसाठी ज्या फौजा जमविल्या होत्या त्या जवळ औरंगाबादेस होत्या. भोपाळ येथे निजाम पेशवे तह झाल्यावर नासिरजंगाची स्वारी दिल्लीस आली. त्यावेळी निजाम दिल्लीस होता. तेवढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई काबीज केली. भोपाळच्या पराभवाचा वचका श्रीमंत बाजीरावांविरुद्ध छत्रपती शाहू महाराजांचे कान फुकून त्याने त्यांच्यात तेढ निर्माण करून काढावयाचा असे निजामाने ठरवून त्यासाठी आपला हस्तक सुमंत यास साताऱ्यास महाराजांकडे पाठविले. पण बाजीरावाविरुद्ध महाराजांचे मन कलुषित झाले नाही. एवढ्यात निजामाच्या वहाड प्रांतावर रघुजी भोसल्याने हल्ला करून तो प्रांत बळकाविला. ह्याचा सूड घेण्याचे मनात आणून नासिरजंगाने जमविलेल्या फौजेनिशी सन १७३९ च्या अखेरीस गोदावरी नदी ओलांडून मराठ्यांच्या मुलुखावर चढाई केली. थोड्या दिसांनी चिमाजी अप्पा व बाजीराव पेशवे नासिरजंगावर चालून गेले. पुढे काही काळ उभयतांची रेटारेट होऊन बाजीरावांनी नासिरजंगास औरंगाबादेपर्यंत पिटत नेले. तेव्हा तो तहास तयार झाला. निरुपाय होऊन त्याने हंड्या व खर्गोण हे दोन जिल्हे बाजीरावास देऊन त्यांच्याशी तारीख २७ फेब्रुवारी १७४० रोजी मुंगी पैठण येथे तह केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २७ फेब्रुवारी इ.स.१८५४
लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली. लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २७ फेब्रुवारी इ.स.१९३१
चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली बलिदान दिन
(जन्म : २३ जुलै १९०६)
तुम्हारी फांसी तुमको मुबारक,
हम तो आझाद है और आझाद ही रहेंगे...
- क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य क्रांतीवीर,
चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४