१७३१ साली शाहू छत्रपति महाराज व शंभूछत्रपत्री महाराज यांचे दरम्यान वारणेचा तह होऊन दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या दोन्ही राजबंधूं मधील सत्तास्पर्धा पूर्णतः संपुष्टात आली तहानिमित्त २७ फेब्रुवारी १७३१ रोजी जाखिणवाडी येथे संभाजीराजे व शाहू महाराजांची प्रथमच भेट झाली शाहू महाराजांनी आपल्या धाकट्या बंधूचे जंगी स्वागत केले ‘संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या पायांवर मस्तक ठेविले शाहू महाराजांनी त्यांस उठवून आलिंगन दिले..’
२७ फेब्रुवारी १७३१...
१७३१ साली शाहू छत्रपति महाराज व शंभूछत्रपत्री महाराज यांचे दरम्यान वारणेचा तह होऊन दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या दोन्ही राजबंधूं मधील सत्तास्पर्धा पूर्णतः संपुष्टात आली तहानिमित्त २७ फेब्रुवारी १७३१ रोजी जाखिणवाडी येथे संभाजीराजे व शाहू महाराजांची प्रथमच भेट झाली शाहू महाराजांनी आपल्या धाकट्या बंधूचे जंगी स्वागत केले ‘संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या पायांवर मस्तक ठेविले शाहू महाराजांनी त्यांस उठवून आलिंगन दिले..’
सातारा मुक्कामी तह झाल्यानंतरही शाहू महाराजांनी संभाजीराजेंना दोन महिने साताऱ्यास ठेवून घेतले होते यानंतर स्वतः महाराजांनी संभाजीराजेंना हत्ती, घोडे, जडावांचा खंजीर, पोषाख व रोख दोन लाख रुपये देऊन निरोप दिला संभाजीराजेंना पोहोचविण्यासाठी फत्तेसिंह भोसले व शाही लवाजमा पाठविण्यात आला स्वतः शाहू महाराज चार कोसपावेतो गेले होते या दोन्ही राजबंधूं मधील संबंध लक्षात घ्यायचे असल्यास वारणेच्या तहाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे..
या तहाबद्दल रियासतकार सरदेसाई म्हणतात., वास्तविक शाहूंनी संभाजीस स्वतंत्र राज्य तोडून दिले नाही राज्याचा हिस्सा असा संभाजीजेस मिळाला नाही मुख्य राज्याचे ताब्यात एक प्रकारची मोठीशी स्वतंत्र जहागीर राज घराण्यातील पुरुष समजून संभाजीराजेस तोडून देण्यात आली पण तहनाम्याकडे पाहण्याचा रियासतकारांचा हा दृष्टिकोन संपूर्णतः चुकीचा व दूषित आहे तहनाम्यातील कलमांचा रियासतकारांनी आपल्या सोयीने विपर्यास केला आहे.. तहातील पहिल्याच कलमात म्हटले आहे.., इलाखा वारूण महाल तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुम्हास दिले असत यातील ठाणी व किल्ले देण्याची क्रिया एखादी जहागीर अथवा देणगी दिल्याच्या स्वरुपाची नाही. तिचे स्वरुप मुलूख तोडून दिल्याच्या स्वरुपाचे आहे आणि हि बाब दुसऱ्याच कलमावरुन स्पष्ट होते, " तुंगभद्रेपासून तहत रामेश्वर संस्थाने निम्मे आम्हाकडे ठेवून निम्मे तुम्हाकडे करार करुन दिली असत या कलमात निम्मे निम्मे वाटून घेण्याची स्पष्ट भाषा आहे दोन भावांच्या मालमत्तेची वाटणी करताना जी परिभाषा वापरण्यात येते तीच या तहनाम्यात सर्वत्र वापरली आहे...
सामान्यतः तह करीत असताना युद्धात पराभूत झालेल्या पक्षाला कनिष्ठ लेखून तहनाम्यातील कलमे ही त्याच्यावर लादण्याच्या स्वरुपाची असतात मात्र असा प्रकार वारणेच्या तहात अजिबात आढळत नाही संभाजीराजे शाहू महाराजांपेक्षा वयाने लहान होते, म्हणून त्यांना कमी प्रतीचे लेखून त्यांचे राज्य म्हणजे केवळ एक 'संस्थान' करावे आणि आपण सांगू तसेच संभाजीराजेंनी वागावे..
असा शाहू महाराजांचा अजिबात हेतू नव्हता उलट पाचव्या कलमात शाहू महाराजांनी "तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी." असे म्हटले आहे. म्हणजेच शाहू महाराजांनी संभाजीराजेंना व कोल्हापूरच्या गादीला आपल्या बरोबरीचे स्थान दिले आहे. युद्धात पराभूत झालेला आहे म्हणून आपल्या लहान भावास कनिष्ठत्वाची वागणूक न देता, त्याला आपल्या बरोबरीचे व त्याच्या हक्काचे स्थान देण्याची शाहू महाराजांची भूमिका हि शिवरायांच्या वंशजास शोभेल अशीच आहे वारणेच्या तहानंतर दर दोन वर्षांनी दोन्ही राजबंधूंच्या भेटीगाठी होत असत सक्रांतीच्या सणाला न चुकता एकमेकांना तिळगूळ पाठविले जायचे एवढेच नव्हे तर आपल्या सरदारांच्या सोयरिकी जमविण्याच्या बाबतीत एकमेकांचा सल्ला घेतला जायचा..
पुढे संभाजीराजेंचे विश्वासू सरदार उदाजीराव चव्हाण राजेंवर नाराज होऊन निजामास मिळाले व राजेंच्या मुलूखास उपद्रव देऊ लागले तेव्हा दि. १० नोव्हेंबर १७३२ रोजी शाहू महाराजांनी उदाजीरावांस पत्र पाठवून संभाजीराजेंच्या मुलूखास उपसर्ग करु नये, अशी ताकीद दिली आहे संभाजीराजेंनी आपणास सेनापती केले नाही म्हणून राणोजी घोरपडे कोल्हापूर राज्यात धुमाकूळ घालू लागले. संभाजीराजे त्यांचा बदोबस्त करीत असता चिमाजी आप्पाने परस्पर राणोजी घोरपड्यास मदत केली, हे समजताच शाहू महाराजांनी चिमाजी आप्पाला खरमरीत पत्र लिहून त्याची कानउघाडणी केली होती. या पत्रात शाहू महाराज म्हणतात..,राणोजी घोरपडे व भगवंतराव यांनी संभाजी राजांची अमर्यादा केली. त्यांचे पारिपत्य ते करीत असता तुम्ही आपणाकडील राऊत घोरपड्यांच्या मदतीस पाठविले व चिरंजीवाचे प्रांतास उपसर्ग केला ही गोष्ट बिलकुल कार्याची नाही. हे उचित न केले. पत्रदर्शनी आपली फौज माघारी आणविणे. पर्याय न लिहिता चिरंजीवाचे चित्तांत विपर्यास न ये तो अर्थ करणे. पत्रदर्शनी फौज बोलवावी. नाही तर आम्ही त्यांचे साहाय्य सर्वथा करु. " संभाजीराजेंना उपद्रव होऊ नये यासाठी शाहू महाराज प्रयत्नशील होते, हे या पत्रातून लक्षात येते. आपल्या कोणत्याही सरदाराने आपल्या बंधूच्या वाटेस जाऊ नये याचा शाहू महाराजांनी बंदोबस्त केला होता. चिमाजी आप्पाने संभाजीराजांविरुद्ध फौज पाठवली असताना शाहू महाराज पिलाजी जाधवरांस म्हणतात, "पंतप्रधानांच्या आगळीकी किती सांगाव्या ? .....फौज पाठवून आमचे बंधूशी युद्ध करितात. तर मग हे प्रत्यक्ष आमच्याशी युद्ध करण्यात अंतर करतील की काय ?" म्हणजे शाहू महाराज 'संभाजीराजांशी युद्ध म्हणजे प्रत्यक्ष आपल्याशी युद्ध', असे मानत होते. महाराजांच्या या भूमिकेतून आपल्या बंधूचा सन्मान जपला जावा व इतरांनी त्यांचेशी आब राखून वागावे, यासाठी महाराज किती प्रयत्नशील होते, हेच दिसून येते. तह झाला, आता त्यांचा आणि आपला काही संबंध नाही, असा विचार न करता मोठ्या भावाची जबाबदारी शाहू महाराजांनी यथोचितपणे पार पाडलेली आहे..
बाजीराव पेशव्याने पोर्तुगीजांशी युद्ध करीत असताना संभाजीराजांच्या मुलूखात धुमाकूळ घालून कारण नसताना संभाजीराजेंची काही ठाणी ताब्यात घेतली. तेव्हा प्रचंड नाराज होऊन राजेंनी शाहू महाराजांकडे त्यांच्या पेशव्याच्या कृत्याचा खुलासा मागितला. यावर दि. ९ नोव्हेंबर १७३९ रोजी महाराजांनी लिहून पाठविले की, " तुम्ही संदेह मानू नये. तुमची आमची भेट व्हावी. तुम्हापेक्षा आम्हास काय थोर आहे ? "
महाराजांनी संभाजीराजेंना भेटीला बोलाविले आहे हे समजताच आपल्या हातचा प्रदेश जाणार असे वाटून तो प्रदेश आपल्या चिरंजीवाचे नावे करुन द्यावा अशी बाजीरावाने महाराजांकडे मागणी केली. पण बाजीरावाची मागणी धुडकावून संभाजीराजेंना भेटीस बोलावून बाजीराव पेशव्याने घेतलेली राजेंची सर्व ठाणी शाहू महाराजांनी राजेंना परत केली.
"तुम्हापेक्षा आम्हास काय थोर आहे ?" अशी वाक्ये केवळ पत्रात लिहिण्यापुरती नव्हे तर महाराज मनापासून तसे मानित होते, हे यामधून सिद्ध होते. आपल्या आईचे संस्कार व रक्ताची नाती महाराज आयुष्यभर विसरले नाहीत. शिवरायांच्या स्वराज्याची जबाबदारी शाहू महाराजांनी समर्थपणे पेललीच पण त्याचबरोबर आपल्या धाकट्या बंधूप्रती असणारी थोरल्या भावाची जबाबदारी पार पाडण्यातही महाराज कुठेच कमी पडले नाहीत..
ह्या महान छत्रपति बंधूंच्या आदर्श बंधूप्रेमास त्रिवार मुजरा...🙏🚩
(उत्तरार्ध)
――――――――――――
#शाहूपर्व...
#जागर_इतिहासाचा...
Keep it up ...
ReplyDelete