आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ फेब्रुवारी १६६२*
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ फेब्रुवारी १६६५*
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे.त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ फेब्रुवारी १६८७*
मोअज्जमला बादशहाने कैद केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ फेब्रुवारी १७०३*
औरंगजेब विरुद्ध मराठे
औरंगजेब स्वतः सिंहगड वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच एकदा १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला.
तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घासदाना आणण्यासाठी छावणीतून बाहेर गेलेल्या औरंगजेबाच्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते. ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मराठ्यांद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण संरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारांवर राग राग करू लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ फेब्रुवारी १८२९*
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले. त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या, परंतु त्यांचा पराभव झाला. संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीने झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ फेब्रुवारी १९१५*
विष्णु पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) या गावचे राहाणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णु पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.
दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ८ क्रांतिकारक :
१) विष्णु गणेश पिंगळे
२) कर्तारसिंह सराबा
३) सरदार बक्षीससिंह
४) सरदार जगनसिंह
५) सरदार सुरायणसिंह
६) सरदार बुटासिंह
७) सरदार ईश्वरसिंह
८) सरदार हरनामसिंह
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"*
🚩
Comments
Post a Comment