संतश्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व वसंत पंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा !
■ तुकाराम महाराज जयंती ■
◆ माघ शुद्ध वसंत पंचमी ◆
__________________________
भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या संत तुकाराम महाराजांनी जगातील सर्व सुख-दु:खांना धैर्याने तोंड दिले, कधी निराश झाले नाहीत . त्यांनी आपली वृत्ती विठ्ठलाच्या चरणी स्थिर केली .
श्री तुकोबांनी संसार सागरात बुडणारी माणसे डोळ्यांनी बघवत नाहीत, अशी खंत व्यक्त करून लोकांना भक्तिमार्गाचा उपदेश केला. ते नेहमी पांडुरंगाच्या भजनात तल्लीन असायचे. संकटाच्या खाईत पडलेल्या समाजाला तुकाराम महाराजांनी प्रबोधनाचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. त्यांच्या बोलण्यात कठोरपणा दिसतो पण त्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश समाजातून दुष्टांचा नायनाट करून धर्माचे रक्षण करणे हा होता.
संतश्रेष्ठ श्री जगदगुरु तुकोबा म्हणतात :
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे ।
जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत ।
करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें ।
विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड ।
ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
....................................
जय जय राम कृष्ण हरी.
श्री तुकाराम महाराजांच्या चरणी प्रेमपूर्वक दंडवत.
.........................................
संतश्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व वसंत पंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा !
बोला पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.....
पंढरीनाथ महाराज की जय.....
Comments
Post a Comment