!! बोलतो मराठी, ऐकतो मराठी !!!! जाणतो मराठी, मानतो मराठी !!मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!#मराठीभाषा #मराठीभाषादिन व इतिहास

!! बोलतो मराठी, ऐकतो मराठी !!
!! जाणतो मराठी, मानतो मराठी !!
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
👉मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे महाराष्ट्रात.जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे.
👉विस्तार 
 उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला.


 प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस.
👉मराठी भाषेचा समृद्ध वारसा 
इ. सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले.

👉हे वाक्य शके ९०५ मधील असून ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात.

👉शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे.

मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी  पेक्षा जास्त आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.

ज्ञानेश्वरी हा मराठीतील ७४५ वर्ष जुना पहिला ग्रंथ.  मराठी ही अभिजात भाषा नाही. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो.

👉ज्ञानेश्र्वरांनी ‘परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे.

भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले.

👉संत एकनाथांनी ‘भागवत’ ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३ व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.




 त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली.

*ऐकू मराठी , बोलू मराठी ,लिहू मराठी , वाचू मराठी , टिकवू मराठी , अभिमान धरू मराठीचा !* 

*आपला मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय....*

 *आपली ' मराठमोळी ' संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा आपण सर्वजण मनापासून निदान प्रयत्न तरी करु या !!!*
👉मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने मला मराठी युवकांना असं आवाहन करावसं वाटतं, की त्यांनी मातृभाषेला मर्यादा न समजता, मराठी बोलणाऱ्या लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने कसं पोचता येईल, याचा  सर्वानी विचार करावा.

👉जर आपला मराठी इतिहास उलगडून पहिला, तर अनेक संत, महापुरुषांनी आणि कलाकारांनी मराठी भाषेतून विज्ञाननिष्ठा आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. विज्ञान जाणण्यासाठी इंग्रजी एक भाषा आहे, नक्कीच त्यात उपलब्ध माहितीही इतर भाषांपेक्षा खूप जास्त आहे. परंतु, याचा अर्थ असा नव्हे, की विज्ञाननिष्ठा, त्याचा प्रसार आणि अभ्यास हा मराठीतून होऊ शकत नाही, त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणे गरजेचे आहे.

#मराठीभाषा #मराठीभाषादिन

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४