शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*७ फेब्रुवारी इ.स.१६५८*
भोरप किल्ल्यावर मराठा सैन्याने हल्ला करून स्वराज्यात आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडा आधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता.शिवाजीं महाराजांना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला.
विजापुरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला. सुधागड म्हणजेच भोरप, भोर संस्थानाचे वैभव सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले. ‍स्वराज्‍याच्‍या राजधानीसाठी रायगडाआधी भोरपगड, म्‍हणजे आताचा सुधागड किल्‍ल्‍याचा विचार करण्‍यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्‍ला सुचवला होता. शिवाजींना राजधानीसाठी रायगड किल्‍ला योग्‍य वाटला. मात्र महाराजांनी सुधागडाच्‍या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्‍ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिक ‍दृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्‍ला म्‍हणून गणला जातो. हा किल्‍ला म्‍हणजे कोकणात उतरणा-या सवाष्‍णीच्‍या घाटाचा पहारेकरीच!

*७ फेब्रुवारी इ.स.१६८५*
मराठ्यांनी धरणगाव शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या. मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वखारही जाळली. ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरणगावाला पाठवले. दोन्ही सैन्यात ७ फेब्रुवारी १६८५ ला चकमकी उडाल्या.

*७  फेब्रुवारी इ.स.१६८८*
आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्यास वेढा  दिला होता. गोवळकोंड्याच्या किल्यातून सतत तोफांचा मारा चालू होता. त्यामुळे मोगल सैन्याची दरोरोज जीवितहानी होत होती.  मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती. गोवळकोंड्याच्या  किल्याच्या सभोवती संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक खोदण्यात आले होते  त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत नव्हते. तीन महिने वेढा चालवून देखील मोगल सैन्यास अपेक्षित यश मिळत नव्हते.

*७ फेब्रुवारी इ.स.१६९८*
किल्ला जिंजी....
१२४० मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्ण कोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला १३८३ ते १७८० या कालखंडात जिंजीवर विजयनगर, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या. या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला. या ९ किलो मीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल वेणुगोपाल, वेंकटरमणा, पट्टाभिरामा मंदिरे, सादत-उल्लाह-खान मशीद, प्रचंड मोठे धान्य कोठार, सुंदर तलाव असे बरेच पाहण्या सारखे आहे.

शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली.. शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली १६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला... धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता पण वेढा काही ढिला पडत नव्हता.. राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली.. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला.

*७ फेब्रुवारी इ.स.१७७१*
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!
दिनांक ७ फेब्रुवारी सन १७७१ रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकल्या. महादजी शिंदेनी शहाआलम बादशहा बादशहाची दिल्लीत व्दाही फिरवली व झाबेताखानाकडून दिल्लीचा ताबा मागीतला. त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महादजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या मार्‍याने दिल्ली अक्षरशः दणाणून सोडली. झाबेताखान आणि त्याच्या सैन्याचा या प्रलयापुढे निभाव लागला नाही. मराठी सैन्याच्या उरात पानिपतचे शल्य दशकभर टोचत असल्याने मराठ्याच्या पराक्रमाला पारावार उरला नव्हता. दरम्यानच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेते तेथे भगवे उभारले होतेच. दिल्लीच तेव्हढी बाकी होती.

*७ फेब्रुवारी इ.स.१८००*
कोल्हापूरचे सरदार गायकवाड बंधु स्मृतिदिन
एकाच लढाईत दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे बंधू शत्रूशी लढा देत असताना धारातिर्थी पडले. कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी या निष्ठावंत गायकवाड बंधूंचे स्मारक बांधले. हे स्मारक आजही आपल्याला पन्हाळगडावर पहावयास मिळते.

जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४