देवगिरीच्या यादव /जाधव राजघराण्याचा महाराष्ट्रातील शासनकाळ हा साधारणपणे ९व्या शतकात सुरु झालेला होता.. पाहू या देवीगिरीच्या यादवचा अप्ररीचित इतिहास

देवगिरीच्या यादव /जाधव  राजघराण्याचा महाराष्ट्रातील शासनकाळ हा साधारणपणे ९व्या शतकात सुरु झालेला दिसून येतो.

महापराक्रमी दृढप्रहार यादव हा या यादववंशाचा पहिला राजा आणि समस्त यादव /जाधव मराठ्यांचा मूळ पुरुष. दृढप्रहार नंतर ही यादव वंशात सेऊणचंद्र, भिल्लमद यादव, कान्हादेव यादव, सिंघणदेव यादव यांच्या  सारखे अनेक  पराक्रमी राजे होऊन गेले यातील सिंघणदेवला यादवला या वंशातील सर्वात यशस्वी आणि पराक्रमी सम्राट  मानले गेले आहे  देवगिरीच्या यादव साम्राजाचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला तो सिंघणदेवच्या शासनकाळातच. सम्राट रामचंद्रदेव जाधव यांच्या शासनकाळात त्यांचा खिलजी कडून पराभव झाला या वैभवशाली साम्राज्याचा अस्त झाला. परकीय शक्तींकडून झालेल्या पराभवांमुळे इतिहासकारांचा  सम्राट रामदेवराय  यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा काही चांगला राहिलेला नसावा. इतिहासकारांनी रामदेवराय  यादव यांना नेहमी एक कमकुवत आणि निष्क्रिय राजा असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे  पण खरं पाहता इतिहासकारांनी रामचंद्रदेव यांचा इतिहास लिहिताना त्यांच्यावर फक्त अन्यायच  केला आहे हे रामचंद्रदेवांची एकंदरीत कारकीर्द पाहता आणि समकालीन ऐतिहासिक पुरावे आणि संदर्भ तपासल्यावर  लक्षात येते.. 
पुरुषोत्तम पुरी चे ताम्रपत्र सांगते की रामचंद्रदेवाने कान्यकुब्ज आणि वाराणसी  ही शहरे म्लेछ यवनी शक्तींपासून मुक्त केली. तत्कालीन कवी नरेंद्रनी त् रुक्मिणी स्वयंवर मध्ये रामचंद्रदेवा बद्दल लिहिताना " म्लेंछ मंडळींचा काळयवनु : जो दक्षिण रावो कालदमनु "  असे  लिहिले आहे याचा अर्थ असा की "दक्षिणचा राया  यादवराया रामचंद्रव म्हणजे म्लेच्छांचा काळ".
एवढाच नव्हे तर रामदेवराय यादवाने इ.स १२७१ पासून ते १३०७ पर्यंत तुर्की आक्रांत्यांना कडी झुंझ दिली.  हे सगळे संदर्भ सिद्ध करतात प्रौढ प्रताप चक्रवर्ती सम्राट रामचंद्रदेव जाधव हे सुद्धा आपल्या महान पराक्रमी पूर्वजांपेक्षा कमी न्हवते व तेवढेच  पराक्रमी होते.

© Arēyavaru Twitter

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४