शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष२२ फेब्रुवारी इ.स.१६८४

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*२२ फेब्रुवारी इ.स.१६८४*
केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र
केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्‍या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.

*२२ फेब्रुवारी इ.स.१६९८*
छत्रपती राजाराम महाराज विशाळगडावर
जिंजी वरून निघताना सुरक्षिततेसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी खंडो बल्लाळ ह्याच्या मार्फत जिंजीच्या वेढ्यातील गणोजी शिर्के ह्यास दाभोळच्या वतना बदल्यात आपल्याकडे वळवले.२६ डिसेंम्बर १६९७ रोजी  वेढ्यातून बाहेर पडल्यावर महाराज व इतर वीस पुरुष बुरखा घालून शिरक्यांच्या महिलांच्या पालखीत बसले व  गणोजीच्या तळावर आले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी शिरक्यांनी शिकारीचा मामला सांगून आपल्या काही माणसांबरोबर  महाराज ,येसाजी दाभाडे हे व इतर पुरुषास शिकारीचा वेष परिधान करून छावणीतून बाहेर काढले. मार्गात जळतगतीने मार्ग कर्मन करत असताना येसाजी दभाडे चा प्रवासातील दगदग सहन न होऊन  मृत्यू झाला.  शिरक्यांनी महाराजांना पुढे रणी च्या किल्ल्या च्या आसमंतात लपून असलेल्या धनाजी जाधव ह्यांच्या फौजेकडे सुपूर्द केले. व मागाहून गिरजोजी यादव  राजस्त्रियांना घेऊन आला. ह्या सर्व मामल्यास झुल्फिकार खानाची गुप्त समनती होती. तरीही ह्या प्रकरणात गणोजी शिर्के ह्यास छावणीत अटक झाली होती. वेल्लोर- कोप्पळ-भुदरगड असा परतीचा प्रवास करत राज कुटुंब सोबत महाराज २२ फेब्रुवारी १६९८ रोजी विशाळगडावर पोहचले.

*२२ फेब्रुवारी इ.स.१७३९*
सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.

*२२ फेब्रुवारी इ.स.१८७९*
वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक
या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे,त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या.शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता.

जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...