भवानीबाईं संभाजीराजे भोसले याचा अपरिचीत इतिहास

…तसेच त्याचे वंशज आता काय करतात…


छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची एक कन्या ही आहे हे खूप कमी जणांना माहीत आहे. या दोघांच्या कन्येचे नाव आहे भवानीबाई. भवानीबाई यांचा इतिहास अतिशय दुर्मिळ आहे. इसवी सन १६८९ मध्ये जेव्हा संभाजींचा मृ त्यू झाला त्यानंतर भवानीबाईंचे पुढे काय झाले, त्यांचा मृ त्यू कसा झाला याचा इतिहास आज आपण जाणून घेऊया.

 भवानीबाईं संभाजीराजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर १६७८ रोजी बिलाजी शिर्के यांच्या शृंगारपुरी येथील वाड्यात झाला. भवानीबाईंच्या जन्मामुळे येसूबाई आई झाल्या, शंभूराजे आबासाहेब झाले. भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबई यांची नात आणि संभाजी महाराज व येसूबाई यांची ज्येष्ठ कन्या आहेत.

 भवानीबाईंचे लग्न महाडिक कुटुंबात झाले म्हणजे तिच्या आत्या अंबिकाबाई महाडिक यांचे पुत्र शंकरराजेशी झाला. अंबिका या छत्रपती शिवराय आणि सईबाई राणीसाहेब यांच्या धाकट्या कन्या आहेत. या दोघांच्या लग्नामुळे भोसले आणि महाडिक कुटुंबात पुन्हा एकदा सोयरीक जुळून आली.

 महाड बंधाराची वतन आणि देशमुखी खेडबंदराची मुकादमी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव महाडिक पडले होते. शहाजीराजांच्या स्वराजाच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी सं बंध आला.

परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हर्जेराजे महाडिक यांच्याबरोबर अनामिक उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह करून छत्रपती शिवरायांनी महाडिक घराण्याशी सोयरीक केली. नाईक, निंबाळकर, जाधव, मोहिते या लोकांशी भोसलेंनी सोयरीक जोडली. महाराणी येसूबाई आणि शाहूराजे मोघलांच्या कै देत असताना भवानीबाईंचे पती शंकरराजेंनी त्यांना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला.

 शंभूराजांच्या मृ त्यूनंतर स्वराज्यावर औरंगजेब आणि मुघलांचा दक्षिणेवर डोळा होता. साऱ्या दक्षिण प्रांतात मोघली फौ ज धुमाकूळ घालत होत्या. अशावेळी हारजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजे आपले थोरले मेव्हणे याना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भिगिनी भवानीबाई यांना चोवीस गावाची सनद दिली व 72 वाड्यांची व पाचही वतणांची सनद त्यांच्या नावे करून दिली.

 शाहू महाराज यांचा आपली ज्येष्ठ बहीण भवानी बाई यांच्यावर खूप प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार आणि धाडशी होत्या. शाहूंनी शंकरराजे याना सनद म्हणून दिलेल्या सातारा जिल्ह्यातील तारळे गावात भवानीबाई आणि ते राहायला गेले. मुघलांच्या धुमकुळामुळे तारळे गावाची हालाखीची परिस्थिती होती. 

परंतु भवानीबाईंनी हे सर्व सांभाळले आणि तिथला कारभार सुरळीत चालू केला. काही दिवसांनी शंकरराजे मरण पावले त्यामुळे भवानीबाईंना सती गेल्या. तारळे गावातील महाडीकांच्या खाजगी स्म शानभूमीत तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे. भवानीबाई यांना दुरगोजी आणि अंबोजी असे दोन पुत्र होते. आजही राजे महाडिक यांचे आठही वाडे दिमाखात उभे आहेत.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४