पाटण खोऱ्यातील पिसाळलेली कुत्री नितीमत्ता गहाण ठेवलेली माणसं आणि वाघ याचा यांचा बंदोबस्त करणारे तांबव्याचा विष्णूबाळा पाटील यांचा अपरिचित इतिहास...


स्वातंत्र्योत्तर काळात कराड तालुक्यातील तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जात होती.

गावच्या चारी बाजूने पाणी असल्याने गावची परिस्थिती एखाद्या बेटासारखे होती. ह्या कारणामुळे बरेच स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होण्यासाठी या गावाचा आसरा घेतात . याच काळामध्ये कै. अण्णा बाळा पाटील व कै. विष्णु बाळा पाटील यांनी आपली कारकीर्द काही वेगळ्याच कारणाने गाजवली होती.


विष्णू बाळा व अण्णा बाळा हे सख्खे भाऊ पैलवान होते.

गावाच्या भाऊ बंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत बंधुमध्ये एक थरारनाट्य घडले होते.ते जुन्या जाणत्या माणसांन कडून आपण ऐकत आलो. मंगला बनसोडे तमाशा मध्ये सुद्धा विष्णु बाळा पाटील यांचा  वघ नाट्य सत्य घटनेवर निर्मित झाले होते . त्यामुळे ही कहाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली. शिवाजी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख.  यांनी विष्णू बाळा वरती पोवाडा गायला आहे.तो आज ही यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांसमोर आहेच. शिवाय मराठी चित्रपट तांब्याचा विष्णू बाळा  सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे खूप चर्चेचा विषय होता. त्यामुळे ही कथा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेच. तरीसुद्धा थोडासा याठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो.

 अण्णा बाळा चा याचं समाजकारणात आणि राजकारणात  वर्चस्व सिद्ध गावातील विरोधी गटाला मान्य नव्हत. त्यामुळे अण्णा बाळाला संपवायचा. असा विरोधी पार्टी कडून कट रचण्यात आला होता.

 या वादातूनच अण्णा बाळा वरती दोन ते दोन वेळा
 हल्ले झाले. पहिलं दुर्लक्ष केलं. नंतर पाय तोडले गेले. आपल्या थोरल्या भावाचा  पाय तोडला या घटनेतून लहान भावाने सूड घेण्याच ठरवलं. लहान भाऊ विष्णु बाळा हा पाटण खोऱ्यातील पिसाळलेल्या कुत्र्यांचाआणि वाघा चा बंदोबस्त  करत होताच .आत्ता त्याला पिसाळलेल्या माणसांचा बंदोबस्त करायचा होता.

 पहिलवान विष्णु बाळा पाटील, यांच्या भावाचा भाऊ बंदकीच्या वादातून चुलत भावाने पाय तोडला होता. परंतु पोलीस कारवाई नंतर न्यायालयाच्या निकालात तो सुटला. हा प्रसंग म्हणजे विष्णू बाळाच्या आयुष्याला कलाटणी देऊन वेगळंच वळण लागले.


थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णू बाळा पाटील याने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलीसांनी रीतसर केस न्यायालयात दाखल केली. न्यायालयात आरोपी सुटल्यामुळे आणि न्याय व्यवस्थेकडून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून सुडाने पेटलेल्या विष्णू बाळा याने अक्षरशः खूनांची मालिका रचली आणि बदला घेतला.

साधारण 1950 ते 60 च्या दशकात कराड तांबवे गावचे प्रसिद्ध पैलवान विष्णू बाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठावठिकाणा संगणाऱ्यास बक्षीस जाहीर केल्याची ही सण 1958 सालची जाहिरात.त्यातही 'तांबव्याचा विष्णु बाळा' यांच नाव सतत चर्चेत असायचं.


पाटण खोऱ्यातील जंगलजाळीत त्यांनी सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं केलं. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि पाटण खोरं रक्तानं न्हाऊन गेलं.  विष्णु बाळा यांनी बरेच खुन केले.

त्यांच्या फरारी घोषित करणारी ही जाहिराती मधील
त्यातील वाक्ये अशी

जाहीर विनंती”१००० /- रु.बक्षीस.सर्व लोकांना कळवण्यात येते की वरील फोटोतील विष्णुबाळा पाटील राहणार तांबवे तालुका कराड जिल्हा उत्तर सातारा हा इसम 1954 सालापासून फरारी असून त्याने आत्तापावेतो चार खून केलेले आहेत. तरी सदर जाहीर विनंतीचे तारखेपासून सहा महिन्यांचे अवधीत जे कोणी सदरहू फरारी इसमास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती देतील , अगर पकडून देतील , त्यांना रोख रु.१००० चे बक्षीस देण्याचे मेहेरबान इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मुंबई राज्य यांनी जाहीर केले आहे. तरी सदर फरारी इसमास पकडण्याचे कामी खात्रीपूर्वक माहिती अगर पकडून देऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यास तमाम जनतेस विनंती आहे".


फरार असताना पाटण खोऱ्यात वास्तव करत असताना 
गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारे विष्णू बाळा पाटील हे कराड च्या आझाद हिंद आखाड्याचे पैलवान. पाटण खोऱ्यात माजलेल्या वाघरांची शिकार करणे व गरीब जनतेला सहायय करणे या गुणांमुळे त्यांचे त्याकाळी मोठे नाव झाले होते. पाटण खोऱ्यातील जंगलजाळीत जपून त्यांनी सावकारी, अन्याय अत्याचार करणारे सर्वांच्या विरुद्ध बंड उभे केले. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली आणि पाटण खोरे रक्ताने न्हाऊन गेले.

ऑगस्ट 2019 च्या महापुरात कै.विष्णु बाळा पाटील व त्यांचे बंधू कै. आण्णा बाळा पाटील यांच्या बंधू प्रेमाचा साक्षिदार असलेला वाडा मुसळधार पावसाने कोसळला. गावच्या राजकारणाचाही साक्षीदार ठरलेला हा वाडा जमीनदोस्त झाल्याने विष्णु बाळा पाटील यांच्या वेळचा गावच्या राजकारणाचा रणसंग्राम यानिमित्ताने पुन्हा एकदा गावांमध्ये चर्चिला गेला.





वाचकांच्या माहिती साठी श्री संग्राम संग्राम, यांनी नवीन माहिती दिली, मी संपादित करीत आहे.

विष्णू बाळा पाटील यांनी अनेक  खुन केले. पण तरीही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. याचे कारण म्हणजे, विष्णू बाळा पाटील यांना शिकारी चा नाद होता. त्यांनी पाटण खोरयातील अनेक शेतकरयांना मदत केली होती. त्यामुळे त्यांना मदत करणारे आणी जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले.

पोलिस विष्णू बाळा पाटील यांना शोधायला आले की, हे मित्र विष्णू बाळा यांना दडवून ठेवत असत.

एक मित्राने तर पोलिस पकडण्यासाठी आले होते आणी विष्णू बाळा सापडतील म्हणून स्वतःच्या पत्नीजवळ विष्णू बाळा पाटील यांना झोपवले होते.

आणी पोलीसांना सांगितले होते की, माझी बहिण व तीचा नवरा आला आहे. एकाच अंथरुणावर एक पुरूष व एक स्त्री झोपले असल्याने पोलीसांना संशय आला नाही.

चार चार खुन होऊनही आरोपी सापडत नाही. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात त्याकाळी हे खुन गाजले होते. राजकारणातपण याचे पडसाद उमटले.

त्याकाळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते कराडचे. म्हणजेच तांबवे गावाच्या जवळ. तसेच विष्णू बाळा यांचे बंधु आण्णा बाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची यशवंतराव चव्हाण यांचे बरोबर ओळख होती.

राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी आण्णा बाळा यांचेबरोबर चर्चा केली. त्यांना समजावून सांगीतले. आणी विष्णू बाळा पाटील यांना पोलीसांना शरण यायला सांगितले. विष्णू बाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचे अपील सरकार तर्फे केले जाईल असे आश्वासन दिले.

विष्णू बाळा यांना यशवंतराव चव्हाण यांचे बोलणे सांगितले. विष्णू बाळा यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलीसांना शरण आले.

खुन खटला सुरू झाला. न्यायालयाने निकाल दिला.

विष्णू बाळा पाटील यांना फाशी झाली.

साधारण अर्धशतकापूर्वी घडलेल्या या घटनेवर काही वर्षांपूर्वी “तांबव्याचा विष्णूबाळा” हा मराठी चित्रपट देखील निर्माण केला आहे तो आज ही यूट्यूब च्या माध्यमातून पहिला मिळेल .


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४