Posts

Showing posts from March, 2022

एका दंथ कथे नुसार स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तळबीड ता कराड येथील येथील राम मंदिर

Image
तलबीड येथील राम मंदिर 

३१ मार्च इ.स.१६६५**(चैत्र वद्य दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार)*आजचे इतिहास दिन विशेष

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *३१ मार्च इ.स.१६६५* *(चैत्र वद्य दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार)* दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला             जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, त

गुडीपाडवा या पारपरिक सना विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ या.

Image
गुडीपाडवा या पारपरिक सना विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ या. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टींचा प्रारंभ होतो. गुढीपाडवा  याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.  या सणाची किती जुनी आहे संदर्भानुसार खाली पाहूया. अशा अनेक कथा दंतकथा सांगितल्या जातात.  परंतु 2 कथा मी खाली देत आहे. या दिवशी फार वर्ष जुनी गोष्ट आहे शक राजायाचे वास्तव्य महाराष्ट्रातील पैठण या ठिकाणी होते. शालिवाहन हा राजा अत्यंत न्यायप्रिय होता. त्याने आक्रमक अशा शंकाना पराभूत करून करून आनंदाच्या प्रित्यर्थ नवीन अशी कालगणना सुरु केली.  त्याला पुढे शक असे म्हटले जाऊ लागले.शक हा शब्द संवत्सर या अर्थाने रूढ झाला. हा शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता. त्याचा शक आसेतुहिमाचल सर्वत्र चालतो. पंचांगगणितातील महत्त्वाची कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत. शालिवाहन शकाच्या प्रारंभीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने किष्किंधावासीयांना वालीच्या छळातून मुक्त केले असे एक कथा सांगितली जाते.  तर दुसऱ्या कथेप्रमाणे प्रभू राम

🙏🏻"कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन"🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🚩

मी आण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की, या महाराष्ट्र सरकारने जर "मराठा समाजाला सुर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर नाही केले" तर दुसर्‍या दिवशीचा सुर्य हा आण्णासाहेब पाटील बघणार नाही...... ही भीष्मप्रतिज्ञा लाखो लोकांच्या समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ रोजी घेतली...... शपथ घेत असताना कै आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या एका डोळ्यात अश्रु तर दुसर्‍या डोळ्यात अंगार होता.... की लाखो मराठा एकत्र येऊन सुध्दा निर्लज्ज सरकार आपली एकही मागणी मान्य करत नाही.... २३ मार्च १९८२ रोजी सकाळी या मराठ्यांच्या क्रांतिसुर्याने आपला शब्द खरा करून दाखवला.... त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार आसताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या मेंदूत रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली.... कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या नंतरही मराठा समाजाला आजूनही न्याय मिळाला नाही.... मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हिच खरी कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांना श्रध्दांजली असेल...... नाहीतर हजारो आण्णासाहेब पाटील तयार

आपल्या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या अग्नीकुंडात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शिवराम राजगुरु, भगतसिंग, सुखदेव या महान क्रातिकारकांचा आज स्मृती दिवस.या क्रांतीकारकांचे विचार आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरक आहेत.त्यांना आज स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

Image
आपल्या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या अग्नीकुंडात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शिवराम राजगुरु, भगतसिंग, सुखदेव या महान क्रातिकारकांचा आज स्मृती दिवस. या क्रांतीकारकांचे विचार आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरक आहेत. माझं मृत शरीर स्विकारायला तु येऊ नकोस आई.. तु आलीस तर तु रडशील.. आणि लोक म्हणतील भगतसिंह ची आई रडते आहे.. -भगतसिंह भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिन्ही वीरांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बावधनची बगाड यात्रा

Image
हि यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे दरवर्षी बगाड यात्रा भरते. बावधन गावामध्ये दोन तरफ आहेत, एक भोसले तरफ आणि एक पिसाळ तरफ. हे दोन्ही तरफ समोरासमोर बसून बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात. बगाड पाहायला बावधन गावामध्ये जवळ पास ३ ते ४ लाख भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. माही पौर्णिमेपासून खर तर बगाडाचा मौहोल या गावामध्ये तयार होत असतो. शिडाला बगाड्या टांगल्या नंतर त्याला पाठीमागे गळ लावलेला असतो. दोन्ही हात वर टांगलेले असतात. दोन माणसे पुढे उभी असतात आणि २ माणसे ही वाघा वर बसलेली असतात. बगाड नेत असताना काही अडचणी आली. बगाड थांबवायचा असेल, किंवा पुढे न्यायाचा असेल हे यांच्यामार्फत सांगितले जाते. बागडाच्या डाव्या बाजूला १० माणसे आणि उजव्या बाजूला १० माणसे असतात. यातील उजव्या बाजूचा मान हा पिसाळ तरफ आणि डाव्या बाजूचा मान हा भोसले तरफ यांना दिलेला असतो. बैलांचा व्यायाम काय असते? बावधानच्या बगाडानिमित्त अतिशय उत्तम बैल बावधन मध्ये सांभाळली जातात. बागडाच्या तयारीसाठी व्यायाम म्ह्णून बैलांकडून शेतीची सर्व कामे करून घ

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२२ मार्च इ.स.१६६६* पोर्तुगीज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल आंतोनियू द मेलू द काश्त्रू याने सल्लागार मंडळाची बैठक बोलावली. इ.स.१६६६ रोजीच्या मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. तो लढविण्यासाठी अंत्रूज महालातील विजापुरच्या अंकीत असलेल्या मोकासदार देसायांनी पोर्तुगिजांकडे दारुगोळ्यांची आणि शस्त्रांस्त्रांची मदत मागितली. देसायांच्या विनंतीचा विचार करण्यासाठी पोर्तुगीज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल आंतोनियू द मेलू द काश्त्रू याने राज्य सल्लागार मंडळाची बैठक बोलावली. *२२ मार्च इ.स.१६७४* ( फाल्गुन वद्य एकादशी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, रविवार ) आनंदराव काकांचे बेहलोलला सडेतोड उत्तर :-            सरनौबत प्रतापराव गुजर काका आणि ६ शूर मावळे शिवरायांच्या शब्दाखातर स्वराज्यासाठी प्राण गमावून बसले. ही बातमी आनंदरावांनी महाराजांना कळवली आणि दिलासा दिला की " सेनापती पडले तरी राग न धरणे, त्यांच्या जागी मी आहे ". महाराजांना आता प्रश्न पडला की, सरनौबत कोण करावा? आलेल्य

करिअरमध्ये खूप मोठे स्थान मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी लोकं मेहनत करतात, स्वत:ला अपडेट ठेवतात. मात्र एवढे करूनही अनेकवेळा पात्रता असूनही लोकांना ते पद मिळू शकलेले नाही. चाणक्य नीतीमध्ये यामागे काही कारणे सांगितली आहेत.

अंमली पदार्थांचे व्यसन माणसाला बरबाद करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्याचे वैयक्तिक आणि कामाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. जसेच काही लोकं तरुण वयातच ड्रग्ज घेण्यास सुरुवात करतात, ते आयुष्यात खूप मागे राहतात. ते पुरेसे पैसे कमवू शकत नाहीत आणि नाव कमवू शकत नाहीत. – आळस ही खूप वाईट गोष्ट आहे, ती कर्तृत्ववान व्यक्तीची प्रतिभा देखील नष्ट करते. तारुण्यातला आळस आयुष्य उध्वस्त करतो. हे असे वय असते जेव्हा माणूस पूर्ण उर्जेने काम करतो आणि आपले भविष्य चांगले करण्यासाठी रात्रंदिवस एक करतो. तर आळशीपणाने तो त्याच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा काळ गमावतो आणि नंतर त्याला आयुष्यभर पश्चाताप होतो. – वाईट संगती माणसाला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात. आपले काम, ध्येये सोडून काही लोकं अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू लागतात. तारुण्याचा मौल्यवान वेळ वाईट संगतीत वाया जातो. तसेच, बर्‍याच बाबतीत, व्यक्ती संपूर्ण आयुष्यासाठी वाईट आणि विस्मरणाच्या अंधारात जाते.

शहाजी महाराज

निजामशाहीची सूत्र हातात घेतली. बादशाह (बहादुर निज़ामशाह) मृत्यु नंतर शके १५४१ म्हणजेच इ.स. १५९९ मध्ये पादशहाची दोन मुले होती. एक 8वर्षें व एक 6 वर्षें ही मुल लहान असल्याने मुलांची आई बेगम साहिबा ने कारभारी कोण करावा या बाबत सर्व मनसबदार बोलावून विचाराणा केली. त्या वेळी शाबाजी अनंत ज्यांस त्याकाळी चतुर संबोधले जात होत.  शहाजी राजे हे बुध्दिवान, शुर मर्द, द्रव्याढ्य आहेत सर्व गुणसंपन्न आहेत त्यांना वज़ीराची वस्त्रे द्यावीत ते निज़ामशाही(पातशाही) जतन करतील असे शाबाजी अनंत यांनी बेगम साहेबांना सुचवले आणि संपूर्ण दरबाराची मान्यता सुद्धा मिळाली.   बेगम साहिबा यांनी फ़ार उत्तम म्हणून हेच कर्तव्य सिध्दांत करून म्हणून शहाजी राजे यांना वज़ीराची वस्त्रे व सन्मान देवून. पादशहाजादे मुर्तज़ा निज़ाम शाह यांस शहाजी राजे यांचे मांडीवर बसवले. निजामशाही ची सर्व सूत्रे त्यांच्या हातात दिली.  यानंतर शहाजींनी महाराज या नावाने निजामशाही चा कारभार पत्रव्यवहारात महाराज असे उल्लेख मिळतात. या नंतर शहाजी राजे सर्व पादशाही दौलतीचा कारभार शबाजी चतुर व बेगम यांचे अनुमतीने चालवू लागले व राजे हा कीताब होताच तो

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ मार्च १५९४* स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचा         वेरुळ (महाराष्ट्र) येथे जन्म (मृत्यू २३ जानेवारी १६६४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९४) ग्राह्य धरतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ मार्च १६७९* छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ मार्च १६८०* आदिलशाहित सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ मार्च १६८८* हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ मार्च १७६०* चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात म

राजनितीतज्ञ शहाजी महाराज

Image
  सन 1594मध्ये 15मार्च या दिवशी शहाजीराजे भोसले याचा जन्म सिंदखेड गावी झाला.वडील मालोजी आणि उमाबाई यांनी नगरच्या शहाशरीफ पिराला केलेल्या नवसा मूळ शहाजी असं नाव ठेवलं असं इतिहास वाचायला आयकायला मिळतो. बाबाजी याच्या भोसले कुटूंबात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. बाळ शहाजीच शिक्षण चालू झालं. खेळण्या बाघडण्याचे दिवस आनंदात चलाले असताना. भोसले कुटुंबावर मोठे संकट ओढवले. मालोजीराजे याच्या ईदापूर येते झालेल्या युद्धामध्ये मालोजीराजे यांना वीरगती प्राप्त झाली.पुढे निजमाशाहीने मालोजीचा मोकासा  पुढे चालू ठेवला. तो शहाजी महाराज याच्या नावे.पराक्रमाचा वारसा, त्याग आणि धैर्य जणू भोसले यांच्या रक्तामध्ये असलेले गुण.    बाळ शहाजी अवघे दहा वर्षाचे होते. जन्मापासून दहा वर्षापर्यंत मालोजीच्या प्रेमाची अनुभूती लहान शहाजीना होती. परंतु अवघ्या दहा वर्षात नियतीन बाळशहाजी बापाच्या छत्र हरवल होत.         वडिलांच्या मृत्यूनंतर  मनसबदारी व जहागिरी कारभार आता कोवळ्या शहाजी वर आली होती.. आणि तेवढ्याच हिमतीने आईच्या साथीने शहाजी महाराजांनी जबाबदारी उचलून पेलू ल

मल्हारराव होळकर

Image
आपल्या पुण्य कर्माने पुण्यात्वाला पोचलेल्या अहिल्याबाई होळकर सर्वांच्या परिचयाचे आहेत   परंतु होळकर घराण्याचे मूळ पुरुष कोण? हा प्रश्न उपस्थित राहतो. इतिहासाशी परिचित असणाऱ्या वाचकांना  इतिहास माहिती आहे. परंतु  घराण्याचे मूळपुरुष असणाऱ्या मल्हारराव होळकर तसे फारच कमी लोकांना माहिती आहे. मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. त्याच्या सैन्यामध्ये शिपाई गिरी करत असताना तरुण थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी त्यांची मैत्री जमली. तिथून त्यांची घोडदौड अशीच चालू झाली. परत त्यांना काही दिवसानंतर सरदारकी शौर्य गाजवून मिळवली.  महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर भारतामध्ये यांची महत्त्वाची भूमिका होती. पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे सुरवातिला जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला होता. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोघांना घाबरून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास

स्वराज्य संकल्पकशहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पुढील पिढीला 'महाराज' का म्हणतात?

Image
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पुढील पिढीला 'महाराज' का म्हणतात?  छत्रपती घराण्याला “छत्रपती” हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर मिळालेला एक सन्मान आहे त्याच प्रकारे शहाजी राजे यांचे कारकीर्दित महाराज हा बहूमुल्य किताब शहाजी राजे भोसले यांना मिळाला होता. पादशाह (बहादुर निज़ामशाह) मृत्यु नंतर शके १५४१ म्हणजेच इ.स. १५९९ मध्ये पादशहाची दोन मुले होती एक आठ वर्षें व एक सहा वर्षें ही मुले लहान असल्याने मुलांची आई बेगम साहिबा ने कारभारी कोण करावा या बाबत सर्व मनसबदार बोलावून मसलत केली त्या वेळी शाबाजी अनंत ज्यांस चतुर संबोधले जाई त्यांनी शहाजी राजे हे बुध्दिवान, शुर मर्द, द्रव्याढ्य आहेत सर्व गुणसंपन्न आहेत त्यांना वज़ीराची वस्त्रे द्यावीत ते निज़ामशाही(पातशाही) जतन करतील असे सुचवले व अर्ज़ केला याला बेगम साहिबा यांनी फ़ार उत्तम म्हणून हेच कर्तव्य सिध्दांत करून म्हणून शहाजी राजे यांना वज़ीराची वस्त्रे देव सन्मान देवून पादशहाजादे मुर्तज़ा निज़ाम शाह यांस शहाजी राजे यांचे मांडीवर बसवले. या नंतर शहाजी राजे सर्व पादशाही दौलतीचा कारभार शबाजी

किल्ले गुणवंतगड किल्ले सातारा जिल्हा लॉग नंबर 23

Image
गुणवंतगड पाटणाहून चिपळूणकडे जाताना एक फाटा फुटतो, त्या फाट्याजवळून पश्चिम-नेऋत्य दिशेला १० किलोमीटर अंतरावर गेल्यास मोरगिरीचा प्रसिद्ध गुणवंतगड किल्ला आहे. पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला आहे. पश्चिम-वायव्य दिशेला दातेगड आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो. १८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला. सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे संदर्भ :- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो डोंगरयात्रा - आनंद पाळंदे दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर किल्ले - गो. नी. दांडेकर दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया सह्याद्री - स. आ. जोगळेकर दुर्गकथा - निनाद बेडेकर दुर्गवैभव - निनाद बेडेकर इतिहास दुर्गांचा - निन

किल्ले दातेगड / सुंदरगड किल्ले साताराजिल्हा ब्लॉग नंबर 22

Image
दातेगड / सुंदरगड सातारा शहराच्या काही तासांच्या अंतरावर टोळेवाडी हे गाव आहे. या गावाच्या शेजारीच दातेवाडी हा प्रसिध्दीपासून वंचित असलेला मात्र इतिहास गाजवणार किल्ला आपल्याला पाहायला मिळेल. चारही बाजूंनी नैसगिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातंच खोदून तयार केल्या आहेत. सह्याद्रीच्या माथ्यावर तलवारीचा भव्य आकार असलेली विहीर हे याचे प्रमुख वैशिष्टय आहे. दातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत आवश्यक आहे. अन्यथा भरकटण्याची शक्‍यता आहे टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या

प्रतापगड किल्ले सातारा जिल्हा ब्लॉग नंबर 21

Image
प्रतापगड विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटाहून अधिक उंच आहेत.

सज्जनगड किल्ले सातारा जिल्हा ब्लॉग नंबर 20

Image
सज्जनगड  प्राचीन काळी या डोंगरावर आश्र्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने ११ व्या शतकात केली. २ एक एप्रिल इ.स.१६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंती वरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले.

वैराटगड ब्लॉग नंबर 19

Image
वैराटगड वैराटगड हा अकराव्या शतकात बाधलेला आहे. त्याच्या निर्मात्याचे नाव राजा भोज आहे. वैराटगड हा सातारा जिल्हात वाई तालुक्यातील किल्ला आहे वाई पासून ८ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गवरील कुठलीही गाडी पकडून, भुईजच्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरवावे.

केंजळगड ब्लॉग नंबर 18

Image
केंजळगड केंजळगड हा तब्ब्ल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला रांगडा किल्ला. हा दुर्ग वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोगररांगाच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोगररांग उतरताना नेऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठया पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो.

किल्ले चंदन वंदन ब्लॉग नंबर 17

Image
चंदन वंदन कथा आणि कादंबऱ्यामध्ये जुळ्या भावाविषयी आपण नेहमीच वाचत आलोय आणि वाचत असतो. मात्र दुर्ग विश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. त्याच्यापैकीच एक म्हणजे किल्ले चंदन-वंदन. साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. इ.स ११९१ ते १९९२ सालच्या तामलेखानुसार ही दुर्गजोडी शिलाहार, राजा दुसरा भोज यांनी बांधली.

किल्ले जंगली जयगड ब्लॉग नंबर 16

Image
जंगली जयगड सातारा जिल्ह्यातील कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरण्याच्या भिंतीजवळ कोयनानगर हे छोटंस टुमदार गाव वसलेले आहे. या गावपासून १२ किलो मीटरच्या अंतरावर जंगली जयगड हा किल्ला आहे. 

किल्ले पांडवगड ब्लॉग नंबर 15

Image
पांडवगड पांडवगड हा इ.स ११७८ ते ११९३ साली बांधण्यात आला. हा किल्ला राजा भोज यांनी बांधला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठी हा किल्ला उभारला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. संह्याद्रीच्या या रांगेतील एका शिंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे.

किल्ले वारुगड ब्लॉग नंबर 14

Image
वारुगड विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी सातारा फल्टनमध्ये शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारुगड हे शिलेदार उभे केले. ज्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन्यास मोठी मदत झाली.

किल्ले संतोषगड ब्लॉग नंबर 13

Image
संतोषगड संह्यार्दीची मुख्य डोंगरांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा डोंगररांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. फलटणच्या माण तालुक्यात आसणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस लागतात.

किल्ले वासोटा सातारा जिल्हा किल्ला ब्लॉग नंबर 12

Image
वासोटा वासोटा ज्या डोंगरावर आहे, तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्यांने या डोंगराला आपल्या गुरूचे नाव  दिले, अशी आख्यायिका आहे. 'वसिष्ठ'चे पुढे वासोटा झाले असावे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

किल्ले महिमंडणगड ब्लॉग नंबर 11

Image
महिमंडणगड सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महिमंडणगड किल्ला आहे. मुबंई गोवा महामार्गावर भरणे नाक्यानंतर चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव खोपी फाटा लागतो, शिरगाव व खोपी या कोकणी गावातून रघुवीर घाट मार्गे पुढे गेल्यास मेठशिंदी या महिमंडणगडाच्या पायथ्याच्या गावी आपण पोहोचतो.

किल्ले मकरंदगड ब्लॉग नंबर 10

Image
मकरंदगड वाई महाबळेश्वराच्या मागे आंबेधळीच्या घाटातून, शिरवली-हातलोट रस्त्याने घोणसपूरकडे गेले असता मधू-मकरंद गड असे जोडकिल्ले नजरेस पडतात. परंतु आज मधुगडावर जाण्यासाठीचा रस्ता शिल्लक नाही. वासोटा आणि प्रतापगड यांना जोडणारा हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.१६५६ च्या सुमारास बांधला होता.

किल्ले पाटेश्ववर ब्लॉग नंबर 9

Image
. पाटेश्ववर पाटेश्वर गडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावर लेण्यामध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी" आहेत. येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या कोरीव केलेल्या पिंडी आपल्याला पाहायला मिळतील.  याशिवाय या लेण्यांत काळसर्षाचे शिल्प व देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहेत, परंतु पुसट झाल्यामुळे हे शिलालेख वाचता येत नाहीत.

किल्ले कल्याणगड सातारा जिल्हा किल्ला ब्लॉग नंबर 8

Image
कल्याणगड सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शूगं आलेले आहे. या शूगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभारलेला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर एकमेव वटवृक्ष आहे, त्यामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो. सातारा शहरापासून सातारा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग, महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. किंवा पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येऊन सातारा रोड रेल्वेस्थानकावर उतरता येते. येथून चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर तीन किलोमीटर आहे. कल्याणगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारी पायवाट आहे. पायथ्याला धुमाळवाडी हे गाव आहे. सध्या या गावाला नांदगिरी असेही म्हणतात. नांदगिरीमधून गडावर जाणार्‍या पायवाटेच्या सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायर्‍या आहेत. सुरवातीच्या पायर्‍या संपल्यानंतर मुरमाड वाट आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर अर्

किल्ले कमळगड लॉग नंबर 7

Image
कमळगड सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेत वसलेला गिरीदुर्ग पर्कारातील किल्ला म्हणजे कमळगड. 1 हजार 280 मीटर (4 हजरा 200 फूट) उंच असलेला हा किल्ला अजूनही महाराजांच्या काही आठवणी जाणिवरित्या करून देतो. किल्ल्यावर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्याचा सुंदर मुलूख दृष्टी क्षेपास येतो. अन्य किल्ल्यांवर आढळणारे किल्ल्यावरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक लक्षणीय डोंगर रांग मात्र लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याच्या आत उतरायला मजबूत पाय-याही आहेत. या भूयाराला गेरूची किंवा कावेची विहीर देखील म्हणतात.

किल्ले अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्हा ब्लॉग नंबर 6

Image
अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. अजिंक्यतारा किल्याची उंची४४०० आहे. व प्रकार गिरिदुर्ग आहे. चढाईची श्रेणी सोपी आहे. ठिकाण सातारा, महाराष्ट्र जवळचे गाव सातारा डोंगररांग सातारा ,बामणोली सध्याची अवस्था व्यवस्थित आहे  प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. 👉असे जाऊ शकाल  अजिंक्‍यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणार्‍या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते किंवा आपण दुचाकीने सुद्धा अजिंक्यातार्यावर जाता येते . सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. ’राजवाडा’ बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने असलेल्ली वाट गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागते. व त्य