महाराष्ट्रातील सर्वात मोठी बावधनची बगाड यात्रा
हि यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे दरवर्षी बगाड यात्रा भरते.
बावधन गावामध्ये दोन तरफ आहेत, एक भोसले तरफ आणि एक पिसाळ तरफ. हे दोन्ही तरफ समोरासमोर बसून बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात. बगाड पाहायला बावधन गावामध्ये जवळ पास ३ ते ४ लाख भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. माही पौर्णिमेपासून खर तर बगाडाचा मौहोल या गावामध्ये तयार होत असतो. शिडाला बगाड्या टांगल्या नंतर त्याला पाठीमागे गळ लावलेला असतो. दोन्ही हात वर टांगलेले असतात. दोन माणसे पुढे उभी असतात आणि २ माणसे ही वाघा वर बसलेली असतात. बगाड नेत असताना काही अडचणी आली. बगाड थांबवायचा असेल, किंवा पुढे न्यायाचा असेल हे यांच्यामार्फत सांगितले जाते. बागडाच्या डाव्या बाजूला १० माणसे आणि उजव्या बाजूला १० माणसे असतात. यातील उजव्या बाजूचा मान हा पिसाळ तरफ आणि डाव्या बाजूचा मान हा भोसले तरफ यांना दिलेला असतो.
बैलांचा व्यायाम काय असते?
बावधानच्या बगाडानिमित्त अतिशय उत्तम बैल बावधन मध्ये सांभाळली जातात. बागडाच्या तयारीसाठी व्यायाम म्ह्णून बैलांकडून शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. त्यांना टायर ला जुंपले जाते. लाकडी ओंढके ओढायला लावले जातात. नांगराला जुंपून जास्तीत जास्त मेहनत त्यांच्या कडून घेतली जातो. पळवणे आणि चालवणे हा व्यायाम सर्रास त्यांच्याकडून घेतला जातो.
बगाड्याची निवड कशी करतात?
बगाड्याची निवड ही होळी पौर्णिमेला केली जाते. बावधानचं मंदिरामध्ये कौल लावला जातो आणि होळी पौर्णिमेनिमित्त बगाड कुणावर आलाय याचा कौल नाथाच्या कृपेंने पंच मंडळी घेत असतात. नवस लावायला जवळपास ५० पेक्षा अधिक मंडळी देखील असतात. पण यातून फक्त एका व्यक्तीची निवड बगाड्यासाठी केली जाते.
देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकावून माणसाची काढलेली मिरवणूक.. ज्याला नवस फेडायचा आहे त्यांने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कुणीतरी ’बगाडस्वार’ होऊ शकतो.
बगाडा असा बनवला जातो. साधारण बाळाचे वजन दोन ते चार टन असते. बांगडा ला खाली दगडाची चाके असतात. दगडी चाकावर मुख्य कना असतो.कन्यवर फूट.त्याचवर साठी साठी वर.वाघ.परत वाघा वर खांब खांबावर शीड आणि शीडाला टांगलेला नवसाचा बागाड्या असतो.
बगाडाच्या आदल्या दिवशी छबिना असतो.त्याच दिवशी बगाड तयार केला जातो. बावधन गावातील सुतार मंडळी बनवण्याचं काम करतात. इतर गावकरी त्यांना या कामी मदत करत असतातच. तीस ते पस्तीस जण बगाडाचा गाडा तयार करून ठेवतात.
दगडाची चाक, कणा हा साडेनऊ फूटचा असतो. दरवर्षी बगडाचा काना नवीन केला जातो. या याठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागते. बगाडाचा गाडा तयार करण्यासाठी सुमारे दहा-पंधरा दिवस आधीपासून तयारी करावी लागते.
बघायला साठी लागणारे लाकूड हे बाभळीचा असतं. या बगडा मध्ये लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही. बडा लागणारे लाकूड घेऊन ओले असते. बगड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरी मध्ये ठेवतात. आणि ते साहित्य पुढील दोन-तीन वर्षे साठी वापरले जाते.
काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी ‘बगाड’ घेण्याची पद्धत आहे.[३] महाराष्ट्रात पुण्याजवळ हिंजवडी येथे म्हातोबाच्या जत्रेत,तसेच बालेवाडी [४]. चैत्री पौर्णिमेस सिरकोली येथे शिरकाई देवीच्या उत्सवात या[५]तुकाराम बीज च्या दिवशी वाई तालुक्यातील फुलेनगर या गावी काळेश्वरी देवीचे बगाड असते
Comments
Post a Comment