सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुलेसावित्रीबाई ज्योतिराव फुले भारतीय समाजसुधारक आणि कवी होत्या. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. 1848 मध्ये त्यांनी पुण्यात देशातील पहिली महिला शाळा स्थापन केली. सावित्रीबाई फुले जातीभेद, वर्णभेद आणि लैंगिकतेला तीव्र विरोध दर्शवत होत्या
सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठीशिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
"भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन"
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
सावित्रीबाई फुले, भारतातील पहिल्या महिला शाळेची पहिली महिला शिक्षिका ही एक अग्रणी व्यक्ती आहे. प्रबळ जातीव्यवस्थेविरुद्ध तिने निर्भयपणे लढा दिला आणि उपेक्षित लोकांच्या उन्नतीसाठी कार्य केले.
तिने सर्व महिलांच्या सन्मानाची मागणी केली, यासाठी तिने पती ज्योतिराव फुले यांच्यासह आयुष्यभर काम केले. तिच्यासाठी मानवता, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय ही तत्वे अत्यंत महत्त्वपूर्ण होती. ज्या काळात स्त्रिया केवळ वस्तू होती, तिने एक स्पार्क पेटविला ज्यामुळे शिक्षणात समानता निर्माण झाली – जे अशक्य होते जे यापूर्वी अशक्य होते.
तिने स्त्रियांवर लादलेल्या भेदभाववादी सीमांच्या विरोधात जोरदारपणे भाष्य केले ज्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले. भारतातील सामाजिक मुक्तीसाठी धर्मनिरपेक्ष शिक्षणावर तिचा भर हा तिच्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ठसा आहे. तिचे संघर्ष आणि कष्ट समजून घेऊन तिचे अधिक चांगले ज्ञान घेऊन आपण अशा जीवनाकडे पहात आहोत ज्याने केवळ भारतातील शिक्षणाचा चेहराच बदलला नाही, तर मानवतेला खऱ्या अर्थाने प्रबुद्ध केले.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ गावाजवळील शंभरदीडशे घराची वस्ती असलेल्या एका छोट्याशा नायगाव खेड्यात खंडोजी नेवासे पाटील राहत होते. त्यांच्याकडे गावच्या पाटीलकीचा मान होता. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई घरकाम करीत असत. या दोघांचाही मनमिळावू स्वभाव होता; परंतु हा भाग अवर्षणाचा असून वर्षानुवर्षे दुष्काळाची परंपरा लाभलेली आणि शूद्र मागासवर्गीय म्हणून शिक्षणापासून वंचित असलेले कुटुंब होते. या गरीब शेतकरी कुटुंबात लक्ष्मीबाई खंडोजी पाटलाच्या घरी ०३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाईचा जन्म झाला. खंडोजी नेवासे पाटलांना नंतर तीन मुलं झाली. त्यामुळे सावित्री व तिचे सिद्जी, सखाराम आणि श्रीपती असे चौघेजण नेवासे कुटुंबात वाढत होते. सावित्री वडील बहीण असल्यामुळे आपल्या भावांना भरपूर प्रेमाने सांभाळून आईला मदत करीत होती.
सावित्री नऊ वर्षांची झाली आणि खंडोजी पाटलांना मुलीच्या लग्नाची काळजी लागली. आणि मुलाचा शोध घेऊ लागले. सावित्रीसाठी पुण्याचे स्थळ घर चालून आले. पुण्यात भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव फुले यांनी सुपुत्र जोतिबांसाठी खंडोजी नेवासे पाटलांकडे सावित्रीसाठी मागणी घातली. त्यावेळी जोतिबाचे वय तेरा वर्षांचे होते. जोतिबा- सावित्रीचा लग्नाचा योग जुळून आला. सन १८४० मध्ये सावित्रीचे जोतिबाबरोबर लग्नसोहळा पार पडला. सावित्री आता सासरी पुण्यात गोविंदराव फुले यांच्या घरी ९ व्या वर्षी नांदावयास आली.
सावित्रीबाई फुले भारतीय विद्येची देवता
सन १८४७ साली जोतिरावांनी सावित्रीचे अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केले. जोतिराव आणि सावित्री एवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्यांनी भारतातील समाज व्यवस्थेचा काळाकूट अंधार दूर सारून समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करण्याचा निर्धार केला. हे एक पाखंडी धर्ममार्तंडाला आवाहन होते.
त्या काळात अहमदनगर येथे इंग्रज महिला मिस फॅरार हिने गोया लोकांच्या मुलींसाठी शाळा चालवित होती. तेथे जाऊन जोतिरावांनी शाळा कार्यप्रणालीचा अभ्यास केले आणि अशीच शाळा पुण्यात काढण्याचे ठरविले.
जोतिरावांनी पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने गंज पेठेतील जागेत मुलीची शाळा ०१ जानेवारी १८४८ रोजी सुरू केली. हा दिवस भारतातील लोकांसाठी शिक्षणाचा क्रांतिकारी दिवस ठरला.
या शाळेतील मुलींना शिक्षण शिकविण्याचा पहिला बहुमान सावित्रींना मिळाला. भारतीय स्त्रियांच्या समग्र क्रांतिपर्वाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर अशा सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला.
पुण्यात जोतिरावांनी मुलींची शाळा काढली असून त्या शाळेची शिक्षिका सावित्री आहे, हे समजताच सनातनी ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पुण्यात ओरड सुरू केली की, धर्माप्रमाणे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना शिकविणे अधर्म आहे. स्त्रीने शिक्षण शिकणे म्हणजे पाप आहे. जात बुडेल, धर्म बुडेल आणि पृथ्वीवर पाप वाढून एक दिवस ही पृथ्वी बुडून जाईल आणि देव सर्वमानव जातीचा संहार करतील, अशी दहशत ब्राह्मणांनी पुण्यात सुरू केली होती. एवढ्यावरच न थांबता सावित्री शाळेला जाताना दगड, शेण मारा करू लागले. जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यावेळी जोतिरावाचे व्यायाम शाळेतील गुरू लहुजी वस्ताद व राणबा महार सावित्रीबाईच्या मदतीला धावून आले. त्यांनी सावित्रीला सुरक्षित शाळेत नेण्याचे व आणण्याचे कार्य सुरू केले.
एका वर्षात शाळेत २५ मुलींनी प्रवेश घेतला. त्यात ब्राह्मण – १०, मराठा-६, चांभार-२, महार-२, मांग-१, धनगर-१, कोष्टी-१, साळी१, माळी-१ अशा जातीच्या मुली शिक्षण घेत होत्या.
जोतिराव आणि सावित्री एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेटाने सुरू ठेवले. हजारो वर्षांच्या अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला एक शाळा कशी पुरी होणार? त्यांनी एका पाठोपाठ एक अशा अठरा शाळा सुरू केल्या. मुलांसाठीही त्यांनी शाळा काढली. अवघ्या चार वर्षांत पुण्यात सात शाळा सुरू झाल्या. पहिली भिडे वाड्यात, दुसरी महारवाड्यात, तिसरी चिपळूणकर वाड्यात, चौथी नाना पेठेत, पाचवी रास्ता पेठेत, सहावी वेताळ पेठेत, सातवी कसबा पेठेत. तसेच पुण्याच्या बाहेर हडपसर, ओतूर, सासवड, शिरवळ, तळेगाव, शिरूर, अंजीरवाडी, करंजे, भिंगार, मुंढवे या ठिकाणी शाळा सुरू केल्या.सावित्रीने आपल्या माहेरी सातारा जिल्ह्यात नायगाव येथेही शाळा सुरू केली. आपल्या जन्मभूमीत अज्ञानरूपी अंधारात ज्ञानाचा दिवा लावून सावित्रीने माहेरचे ऋण फेडले.
शाळांचा विस्तार वाढत गेला तसा सावित्रीचा कामाचा व्यापही वाढला. त्या सुरुवातीला शिक्षिका होत्या. नंतर मुख्याध्यापिका झाल्या. जोतिबा सावित्रीने सुरू केलेले कार्य सनातनी ब्राह्मणांना पहावले नाही. एक शूद्र माळ्याची बाई स्वतः शिकते आणि इतरांना शिकवते हे त्यांच्या वृत्तीला परवडणारे नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा गोविंदरावांना धर्माचा आसरा घेऊन आपल्याच मुलाच्या विरोधात तयार केले.
जोतिरावांना आपल्याच घरातून सन १८४९ साली बाहेर पडावे लागले. सावित्रीच्या सख्या भावानेही पत्र लिहून सावित्रीबाईंला शिक्षणाचे कार्य थांबविण्यास सांगितले. सावित्री आणि जोतिबांनी काम थांबवावे यासाठी चारही बाजूंनी प्रयत्न केले. पण निष्फळ ठरल्यावर ब्राह्मणांनी आडदांड माणसाला हाताशी धरून बेअब्रू करण्याची धमकी दिली. पण सावित्री डगमगल्या नाहीत.
शाळेत जाण्याच्या रस्त्यावर लहान मुलांकडून कधी मोठ्या माणसांकडून सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले जाई. दगड मारले जात. त्यावेळी त्या निमूटपणे पुढे जात. सावित्रीबाई शाळेत जाताना सोबत एक साडी घेऊन जात आणि शाळेत गेल्यावर शेणा-चिखलाने भरलेली साडी काढून दुसरी साडी नेसत. परंतु त्या आडदांड माणसाने अब्रूचा विषय काढताच त्या संतापल्या आणि पुढे होऊन त्या आडदांड माणसांच्या थोबाडात फाड फाड थापडा मारल्या. त्यामुळे त्या आडदांड माणसाची बोबडी वळली. एक खंबीर महिला म्हणून सावित्रीच्या नावाची सगळीकडे चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा कोणी सावित्रीला बोलण्याची हिंमत केली नाही.
या सर्व संकटावर मात करून सावित्रीबाई खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांसाठी विद्येची देवता ठरल्या.
Comments
Post a Comment