आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


*१८ मार्च १५९४*
स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचा         वेरुळ (महाराष्ट्र) येथे जन्म (मृत्यू २३ जानेवारी १६६४)
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९४) ग्राह्य धरतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मार्च १६७९*
छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मार्च १६८०*
आदिलशाहित सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मार्च १६८८*
हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मार्च १७६०*
चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापासून दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण करण्यासाठी मराठे युद्धाला निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मार्च १७७३*
रायगड व लिंगाणा किल्ल्यावर यशवंतराव पोतनीसांची सत्ता होती. ती त्यांच्याकडून काढून घेण्याचा विचार माधवराव पेशव्यांनी केला. परंतु माधवराव पेशव्यांच्या अकाली निधनामुळे ते काम अर्धवट राहिले. नारायणराव पेशवे पेशवेपदावर आल्यावर परत रायगडाच्या मोहिमेचे काम हातात घेण्यात आले. छत्रपतींच्या आज्ञेशिवाय पोतनीस पेशव्यांना किल्ला देत नव्हते. पेशव्यांचे सैन्य रायगडाला येऊन भिडले.
रायगडावर यशवंतराव मोरे हा हवालदार व त्याच्या हाताखाली बालकाजीराव पालांडे हा सरदार होता. आपाजी हरी हा पेशव्यांचा सेनापती होता. त्याने साम दाम-दंड-भेद या सर्व उपायांनी रायगड जिंकला. (दि. १८ मार्च १७७३).
यशवंतराव व शाहूराजे यांचे संबंध अत्यंत निकटचे होते. यशवंतराव हे मुरारबाजी देशपांडेंचे बंधु महादजी यांचे पुत्र होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मार्च १९४४*
२६ जानेवारी १९४४ ला सुभाषबाबूंनी रंगून येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. नेताजींची अमरवाणी , "तूम मुझे खून दो - मै तुम्हे आजादी दुंगा !" ही इथूनच प्रगट झाली. १८ मार्च १९४४ या दिवशी १०,००० सैन्यानिशी नेताजींनी मातृभूमीत प्रवेश करून इंफाल, मोरा, कोहिमा या ठिकाणी प्रतिपक्षावर विजय मिळवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४