१६ व्या शतकांत घाडगे, घोरपडे, जाधव, निंबाळकर, मोरे, शिंदे, डफळे, माने वगैरे मोठमोठ्या मराठे सरदारांकडे दहा दहा विस विस हजार पथकांचे सेनापतित्व होतें, व त्या मानानें त्यांस लहानमोठ्या जहागिरीही होत्या. मुसलमानी राजांस तुर्की, इराणी, पठाण, मोगल वगैरे लोकांपासून उपयोग न होतां त्रास मात्र होत असे. ह्मणून ते राजे त्या लोकांस सैन्यांत बहुश: न ठेवता मराठ्यांसच ठेवीत. मराठे शिलेदार व बारगीर यांच्यावरच त्यांची सारी भिस्त असे.
सहावे. ह्याप्रमाणें दक्षिणेंत हिंदु व मुसलमान या दोन जातींमध्यें राजसत्ता विभागून गेल्यानें, उत्तरेप्रमाणें. इकडे मुसलमानांचा विशेष नक्षा वाढला नाहीं.
ते बेफिकीर झाले नाहींत. हिंदु लोकही स्वराज्याचा थोडासा अनुभव घेत असल्यामुळें, उत्तरेकडील हिंदूंप्रमाणें परकीयांच्या पूर्णपणें आधीन होऊन, शुद्ध गोगलगाई बनले नाहीत.
मुसलमानी फौज स्वराज्याशीं नाखुष झाली ह्मणने विजयानगरची नोकरी पतकरी व मराठे शिलेदार वारगीर प्रसंगवशात् मुसलमानाकडे जात.
दुस-या ब्राह्मणी रानाचे २०९ शिलेदार शरीरसंरक्षक होते. वारंवार लढाईचे प्रसंग आल्यामुळें, लोकांस युद्धशिक्षण व संपत्ति पुष्कळ मिळे.
१६ व्या शतकांत घाडगे, घोरपडे, जाधव, निंबाळकर, मोरे, शिंदे, डफळे, माने वगैरे मोठमोठ्या मराठे सरदारांकडे दहा दहा विस विस हजार पथकांचे सेनापतित्व होतें, व त्या मानानें त्यांस लहानमोठ्या जहागिरीही होत्या. मुसलमानी राजांस तुर्की, इराणी, पठाण, मोगल वगैरे लोकांपासून उपयोग न होतां त्रास मात्र होत असे. ह्मणून ते राजे त्या लोकांस सैन्यांत बहुश: न ठेवता मराठ्यांसच ठेवीत. मराठे शिलेदार व बारगीर यांच्यावरच त्यांची सारी भिस्त असे.
सदर्भ :-
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा 1714-1761
Comments
Post a Comment