संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा २००२२ श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर 🚩 मंगळवार दिनांक २१/०६/२२ पालखी सोहळा प्रस्थान
🙏🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा २००२२ श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर 🚩 मंगळवार दिनांक २१/०६/२२ पालखी सोहळा प्रस्थान आळंदी ( ज्ये.कृ. ८ ) 🚩 बुधवार दिनांक २२/०६/२२ पहिला मुक्काम भवानी पेठ पुणे ( ज्ये. कृ. ९ ) 🚩 श्री सद्गुरू वामनानंद महाराज चिन्मयानंद संस्थान यांची पुण्यतिथी 🚩 गुरूवार दिनांक २३/०६/२२ दुसरा मुक्काम भवानी पेठ पुणे ( ज्ये. कृ. १० ) 🚩 शुक्रवार दिनांक २४/०६/२२ तिसरा मुक्काम बाजार तळ सासवड ( ज्ये. कृ. ११ एकादशी ) 🚩 शनिवार दिनांक २५/०६/२२ चवथा मुक्काम बाजार तळ सासवड ( ज्ये. कृ. १२ द्वादशी ) श्री संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी 🚩 रविवार दिनांक २६/०६/२२ पाचवा मुक्काम जेजुरी ( ज्ये. कृ. १३ ) 🚩 सोमवार दिनांक २७/०६/२२ सहावा मुक्काम वाल्हे ( ज्ये. कृ. १४ ) 🚩 मंगळवार दिनांक २८/०६/२२ सातवा मुक्काम लोणंद बाजार तळ ( ज्ये. कृ. दर्श अमावस्या पहाटे ५: ५१ नंतर ) 🚩 बुधवार दिनांक २९/०६/२२ आठवा मुक्काम लोणंद बाजार तळ ( ज्ये. कृ. अमावस्या सकाळी ०८:२१ पर्यंत ) 🚩 गुरूवार दिनांक ३०/०६/२२ नववा मुक्काम तरडगाव ( आषाढ शुद्ध प्रतिपदा ) 🚩 शुक्रवार दिनांक ०१/०७/२२ दहावा मुक्काम फलटण विमानतळ ( आषाढ शुद्ध ०२ ) 🚩 शनिवार दिनांक ०२/०७/२२ अकरावा मुक्काम फलटण विमानतळ ( आषाढ शुद्ध ०३ ) 🚩 रविवार दिनांक ०३/०७/२२ बारावा मुक्काम बरड ( आषाढ शुद्ध ०४ ) 🚩 सोमवार दिनांक ०४/०७/२२ तेरावा मुक्काम नातेपुते ( आषाढ शुद्ध पंचमी ) 🚩 मंगळवार दिनांक ०५/०७/२२ चौदावा मुक्काम माळशिरस ( आषाढ शुद्ध षष्ठी ) 🚩 बुधवार दिनांक ०६/०७/२२ पंधरावा मुक्काम वेळापूर ( आषाढ शुद्ध सप्तमी ) 🚩 गुरूवार दिनांक ०७/०७/२२ सोळावा मुक्काम भंडी शेगांव ( आषाढ शुद्ध अष्टमी ) 🚩 शुक्रवार दिनांक ०८/०७/२२ सतरावा मुक्काम वाखरी ( आषाढ शुद्ध नवमी ) 🚩 शनिवार दिनांक ०९/०७/२२ आठरावा मुक्काम पंढरपूर ( आषाढ शुद्ध दशमी ) 🚩 रविवार दिनांक १०/०७/२२ एकोणिसावा मुक्काम पंढरपूर ( आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी एकादशी ) 🚩 सोमवार दिनांक ११/०७/२२ विसावा मुक्काम पंढरपूर ( आषाढ शुद्ध द्वादशी, पारणे ) 🚩 मंगळवार दिनांक १२/०७/२२ एकविसावा मुक्काम पंढरपूर ( आषाढ शुद्ध १३/१४ पौर्णिमा प्रारंभ उ. रा. ४:००वा.) श्री संत मामासाहेब दांडेकर पुण्यतिथी ) 🚩 बुधवार दिनांक १३/०७/२२ बाविसावा मुक्काम पंढरपूर,गोपाळपूर गोपाळकाला ( आषाढ शुद्ध १५ गुरूपौर्णिमा, कुलधर्म व्यासपूजा ) माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास आळंदीकडे प्रस्थान तेविसावा मुक्काम वाखरी 🚩 शुक्रवार दिनांक २२/०७/२२ एकतिसावा मुक्काम पुणे ( आषाढ कृष्ण ०९ ) 🚩 शनिवार दिनांक २३/०७/२२ संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा सांगता समारोह आळंदी 🚩 हा संपूर्ण पायी वारी सोहळा एकूण बत्तिस दिवसांचा असतो व तो सर्व तळागाळातील वारकऱ्यांच्या सहकार्याने अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबध्द संपन्न होत असतो आयुष्यात एकदा तरी हा सोहळा अनुभवावा. म्हणजे निष्काम भक्तिचे स्वरूप कसे असते ते पहावयास मिळेल, धन्यवाद 🙏🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩 कोरोना, ओमिक्राॅन, व्हेरीएंटचे संकट नाही आल्यास अशाप्रकारे आषाढी वारी संपन्न होईल याची वारकऱ्यांनी नोंद घ्यावी व श्री पांडुरंगाला साकडे घालावे की, हे संकट आम्हांवर येऊ देऊ नकोस व आमची नियमित वारी निर्विघ्नपणे होऊ दे....🙏🙏 काही ठिकाणी दिनांक वेळ चुक भूल झाली असेल तर क्षमा असावी माऊली कमेटीकडून दुरूस्ती करून घ्यावी. तसेच माऊली सोहळ्यातील रींगण माहिती कमेटीकडून आल्यावर मिळेल 🚩 राम कृष्ण हरी 🚩
आपला संतसेवक
राजेंद्र पाटील. सांगवड
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य पाटण तालुका अध्यक्ष
Comments
Post a Comment