गुडीपाडवा या पारपरिक सना विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ या.
गुडीपाडवा या पारपरिक सना विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ या.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टींचा प्रारंभ होतो. गुढीपाडवा याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या सणाची किती जुनी आहे संदर्भानुसार खाली पाहूया. अशा अनेक कथा दंतकथा सांगितल्या जातात. परंतु 2 कथा मी खाली देत आहे.
या दिवशी फार वर्ष जुनी गोष्ट आहे शक राजायाचे वास्तव्य महाराष्ट्रातील पैठण या ठिकाणी होते. शालिवाहन हा राजा अत्यंत न्यायप्रिय होता. त्याने आक्रमक अशा शंकाना पराभूत करून करून आनंदाच्या प्रित्यर्थ नवीन अशी कालगणना सुरु केली. त्याला पुढे शक असे म्हटले जाऊ लागले.शक हा शब्द संवत्सर या अर्थाने रूढ झाला. हा शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता. त्याचा शक आसेतुहिमाचल सर्वत्र चालतो. पंचांगगणितातील महत्त्वाची कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत.
शालिवाहन शकाच्या प्रारंभीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने किष्किंधावासीयांना वालीच्या छळातून मुक्त केले असे एक कथा सांगितली जाते.
तर दुसऱ्या कथेप्रमाणे प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता, अशा काही मान्यता गुढीपाडवा आणि शालिवाहन शक संवत्सराविषयी सांगितल्या जातात. अनेक ठिकाणी संदर्भ सांगितल जातात.
या दिवशी ऋतुचक्र बदलतं, शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येते.
पुजा साहीत्य - वेळुची काठी,उटणं, सुगंधीत तेल,हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा कलश,सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती,नागलीचे पाने,फळे,सुपारी,तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले.
कडुनिंबाचा प्रसाद- कडुनिंबाची कोवळी पाने,फुले,चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे,हिंग,गुळ
घरातली जुनी जाणती माणसं ज्याप्रकारे गुढीपाडव्याचा सण साजरा करत आलेत त्या पद्धतीचा अवलंब करून सन साजरा करावा.
हिंदू कालगणनेनुसार सरते वर्ष फाल्गुन मासाने पूर्णत्वास येते आणि नववर्षाचा शुभारंभ वर्ष चैत्र मासाच्या आगमनाने होतो.
यंदा गुढीपाडवा 2 एप्रिल या दिवशी आहे.
Comments
Post a Comment