मल्हारराव होळकर
आपल्या पुण्य कर्माने पुण्यात्वाला पोचलेल्या अहिल्याबाई होळकर सर्वांच्या परिचयाचे आहेत
परंतु होळकर घराण्याचे मूळ पुरुष कोण? हा प्रश्न उपस्थित राहतो. इतिहासाशी परिचित असणाऱ्या वाचकांना इतिहास माहिती आहे. परंतु घराण्याचे मूळपुरुष असणाऱ्या मल्हारराव होळकर तसे फारच कमी लोकांना माहिती आहे.
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. त्याच्या सैन्यामध्ये शिपाई गिरी करत असताना तरुण थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी त्यांची मैत्री जमली. तिथून त्यांची घोडदौड अशीच चालू झाली. परत त्यांना काही दिवसानंतर सरदारकी शौर्य गाजवून मिळवली. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर भारतामध्ये यांची महत्त्वाची भूमिका होती. पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे सुरवातिला जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला होता.
मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोघांना घाबरून असायचे.
अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता.
तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला.(२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता होता.
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले.
अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले.
आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या, व एका छत्रपतिची पूर्ण कारकीर्द कारकिर्दी बघितल्या.
Comments
Post a Comment