स्वराज्य संकल्पकशहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पुढील पिढीला 'महाराज' का म्हणतात?

पादशाह (बहादुर निज़ामशाह) मृत्यु नंतर शके १५४१ म्हणजेच इ.स. १५९९ मध्ये पादशहाची दोन मुले होती एक आठ वर्षें व एक सहा वर्षें ही मुले लहान असल्याने मुलांची आई बेगम साहिबा ने कारभारी कोण करावा या बाबत सर्व मनसबदार बोलावून मसलत केली त्या वेळी शाबाजी अनंत ज्यांस चतुर संबोधले जाई त्यांनी शहाजी राजे हे बुध्दिवान, शुर मर्द, द्रव्याढ्य आहेत सर्व गुणसंपन्न आहेत त्यांना वज़ीराची वस्त्रे द्यावीत ते निज़ामशाही(पातशाही) जतन करतील असे सुचवले व अर्ज़ केला याला बेगम साहिबा यांनी फ़ार उत्तम म्हणून हेच कर्तव्य सिध्दांत करून म्हणून शहाजी राजे यांना वज़ीराची वस्त्रे देव सन्मान देवून पादशहाजादे मुर्तज़ा निज़ाम शाह यांस शहाजी राजे यांचे मांडीवर बसवले. या नंतर शहाजी राजे सर्व पादशाही दौलतीचा कारभार शबाजी चतुर व बेगम यांचे अनुमतीने चालवू लागले व राजे हा कीताब होताच तो ‘महाराज’ म्हणून पत्रव्यवहार करू लागले. परंतू राजकारणास्तव हिंदू राजा वजीरीची वस्त्रे घेवून महाराजा बनला आहे हे मुस्लिम सरदार व आदिलशाह तसेच मुघलांना न पचणारे होते. मलिक अंबर यांचा मृत्यु शके १५४८ म्हणजेच इ.स.१६२६ मध्ये झाल्याने शहाजी महाराज व शबाजी चतुर यांचेच वर्चस्व होते हे वर्चस्व मलिकअंबर यांचा मुलगा फत्तेखान याला सहन न झाल्याने स्वत:ला वजिरी मिळावी या हेतूने जाधवराव मंडळींच्या पुर्ववैमनस्याचा फ़ायदा घेत शहाजी महाराज यांचे विरोधात कटकारस्थान सुरू केले. यांच वेळी शाहजहानने १६३६ मध्ये निज़ामशाही खालसा केली या मध्ये शहाजी महाराजांनी आदिलशाही स्विकारली त्या मुळे त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्यांनी गौरवण्यात आले . सोबतच पुणे -सुपे ही जहांगीरी ही तशीच ठेवण्यात आली पुढे शहाजी महाराजांनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले त्या मुळे इ.स. १६३७ मध्ये महंमद आदिलशहाने कर्नाटकात जहांगीरी देवून शहाजी महाराजांची कर्नाटक मध्ये रवानगी केली. तेथे त्यांनी पेनुकोंडे, बसवपट्टनम्, होपेस्ट,बिदनूर,श्रीरंगपट्टनम व इतर ठीकानच्या पाळेगारंविरूध्द मोहीमा आखून तो प्रदेश आदिलशाही मध्ये आणला या सन्मानार्थ शहाजी महाराजांना इ.स. १६४८ मध्ये बेंगलोर ची जहागीरी व ‘महाराज’ सोबत ‘महाराज फर्जंद’ हा कीताब देण्यात आला. याचा उल्लेख ‘ऐतिहासिक फ़ारसी साहित्य खंड१ लेखांक१९’ मधील फ़ारसी पत्रलेखनात आढळतो. ज्या प्रमाणे छत्रपती हा विशेष कीताब शिवाजी महाराजांनंतर ही चालत राहीला त्याच प्रमाणे ‘महाराज’ हा ही कीताब आजही छत्रपती घराने आदराने बाळगत आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४