देशमुख

देशमुख

देशमुख हे मराठी आडनाव आहे.

♦'देशमुख' हे छत्रपति शिवाजीच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत.अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख हि पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणे-शाही तील 'ड्युक' चे समकक्ष आहे.

♦'देशमुख' पदवी वा 'देशमुखी' हे वतन कोणत्याही एका विशिष्ट धर्म वा जाती चे संदर्भात नसून ,इतिहासकालीन हिंदू व मुस्लिम राजांनी , हिंदू मधील मराठा, ब्राह्मण यासह इतर जाती तसेच, मुस्लिम व जैन धर्मातील कुटुंबाना ' देशमुखी' बहाल केल्याचे दिसून येते.

♦'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत.गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी.लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे,शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत.

♦'देशमुख' पदवी प्राप्त कुटुंबाकडे ,अधिकार क्षेत्रा पासून महसुल प्राप्त करणे या सोबतच, अधिकार क्षेत्रात वा परगण्यात मूलभूत सेवा व सुव्यवस्था राखणे हि जबाबदारी असे. या कारणास्तव, देशमुख चा स्वैर अनुवाद 'देशभक्त' ('loosely translated as' Patriot ') असा हि होतो व या नावा विषयी अद्याप हि समाजात आदर आहे .

♦'देशमुख' हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी या देशमुखांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले. अनेक देशमुखांच्या वरचा अधिकारी तो सरदेशमुख.

♦देशमुखांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. हे काम करणारी काही माणसे आपल्या आडनावाला देशमुख हा शब्द जोडत. ब्रिटिशांच्या राजवटीत देशमुखी संपली आणि देशमुख आणि सरदेशमुख हे शब्द फक्त आडनावांत राहिले. 

’देशमुख’ जोडलेली काही आडनावे
पिसाल देशमुख
निकम देशमुख
चिकने देशमुख
गाढ़वे देशमुख
घारगे देशमुख  
चव्हाण देशमुख
शिंदे देशमुख
फडतरे देशमुख *(सातारा प्रांत )

कोंडे देशमुख,
बांदल/बागल देशमुख
राजेसाळुंखे देशमुख
इंदुलकर देशमुख,

जगताप देशमुख,
जाधव देशमुख,
जेधे देशमुख,
ढमाले देशमुख,
धुमाळ देशमुख,
पासलकर देशमुख,
माने देशमुख,
राजेशिर्के देशमुख,
काकडे देशमुख,

शिळीमकर देशमुख,
शितोळे देशमुख,
पायगुडे देशमुख
मरळ देशमुख
मारणे देशमुख

⛳बारां मावळ ⛳

बारां मावळ आणी त्या बारां मावळचे देशमुख कोण हे पाहू 

शहाजीराजांच्या पुण्याच्या परिसरातील मोकाशांचा व्यवस्थापक म्हणून शिवरायांकडे नेमका किती प्रदेश होता ते पाहू 

पुणे, सुपे ,चाकण, इंदापूर , व् शिरवळ हे पाच परगणे आणिबारां मावळे या विभागा मधील बारां मावळ बद्दल माहिती घेवू ,

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत. आशा दोन उपशाखांच्या मधून सामन्यात:एखादी छोटीशी नदी उगम पावते. या नद्यांच्या खोऱ्याना मावळ किंवा खोरी म्हणत 

उदाहरणार्थ: रोहिडमावळ, नाणे मावळ, पवन मावळ, मोसे खोरे, वेळवंड खोरे इत्यादी.

(१)👉🏽 रोहिडखोरे

रोहिड खोरे नीरा नदीच्या खोर्याच्या काही भागात वसले आहे त्यात ४२ गावे होती 

रोहिड़ा किल्ला हे या खोऱ्याचे मुख्य ठिकाण होते.

रोहिड खोऱ्याची देशमुखी खोपडे आणी जेधे या दोन घराण्यात विभागली गेली होती त्या मुळे जेधेंना ज्या भागाची देशमुखी होती त्याला भोर तरफ आणी खोपडे ज्या भागाची देसमुखी होती ती उत्रोली तरफ
आशा रोहिड़े खोऱ्याच्या दोन तरफ झाल्या होत्या .

(२)👉🏽 हिरडस मावळ

हिरड्स मावळ नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे.
हिरड्स मावळात ५३ गावची संख्या आहे.
हिरडस मावळातील सर्व गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोड़तात 
हिरडस मावळातील ५३ गावापैकी फक्त सिंद या गावच्या नावामागे कसबा ही उपाधी आहे 
इतर गावच्या मागे मौजा ही उपाधी लावलेली असते त्यावरून शिंद हे त्या मावळाचे मुख्य ठिकाण होते 

हिरड्स मावळचा देशमुखी ही बांदल घरान्याकडे होती.यांना "इतबारराव" हा किताब होता

(३)👉🏽 वेळवंड खोरे

वेळवंड खोरे वेळवंडी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. वेळवंडी
नदी गुंजण मावळात उगम पावते आणी पुढे वेळवंड खोऱ्यातुन वाहत जावून रोहिड्या खोऱ्यातील नीरा नदीस मिळते

ह्या खोऱ्यातील गावची संख्या आहे ३३
ह्या खोऱ्यातील मुख्य ठिकाण होते हर्णस
ह्या खोऱ्याची देशमुखी होती 

"सरदार बाबाजी धुमाळ"
"डोहर" ह्यांना "आढळराव" असा किताब होता 

(४)👉🏽 गुंजन मावळ

हे मावळ गुंजवणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. गुंजवणी नदी याच मावळात उगम पावते आणी पुढे नीरा नदीस मिळते

गुंजन मावळात ८१ गावे होती 
गुंजन मावळातील गावापैकी काही गावे सध्याच्या भोर तालुक्यात मोड़तात आणी बाकीची वेल्हा तालुक्यात मोड़तात 

ह्या मावळातील मुख्य गाव आहे 
आंबवणे ह्या मावळात राजगड हां किल्ला आहे

गुंजण मावळच्या देशमुखाच् नाव आहे शिळीमकर त्यांचा किताब "हैबतराव" आसा होता.

(५) 👉🏽कानद खोरे

कानद खोरे कानंदी नदीच्या खोऱ्यात वसले आहे. कानंदी नदी याच खोऱ्यात उगम पावते आणी पुढे गुंजण मावळात गुंजवणी नदीस मिळते.

ह्या मावळ् चे मुख्य ठिकाण कानद खोऱ्याच्या नावावरूनही, कानद हे त्या खोऱ्याचे मुख्य ठिकाण होते 
तोरणा किल्ला हां कानद मावळातील 
कानद खोऱ्याचा देशमुखाचे आड़नाव आहे मरळ त्यांचा किताब होता " झुंझारराव "

(६) 👉🏽 मोसे खोरे

मोसे खोरे मोशी नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ही नदी मोसे खोऱ्यातच पुढे मुठा नदीस मिळते.
 ह्या मावळातील गावची संख्या आहे ८२

ह्या मावळा चे मुख्य ठिकाण आहे मोसे बुद्रुक 

मोसे खोऱ्याचे देशमुखी होती 
पासलकर त्यांचा किताब होता "यशवंतराव " 

(७) 👉🏽मुठा खोरे

मुठा खोरे हे मुठा नदीच्या उगमापासून काही आंतरावर तीच्या खोऱ्यात वसले आहे मुठा नदी पुढे मोसे खोऱ्यातुन व् कर्यात मावळातून वाहत जाते आणी पुणे परगण्याच्या हवेली तरफेत मुळा नदीस मिळते.
मुठा खोऱ्यातील गावाची संख्या आहे १९ 
मुठा खोऱ्यात एकही किल्ला नाही 
मुठा खोऱ्याचे देशमुख आहे मारणे त्यांचा किताब आहे "गंभीरराव"

(८) 👉🏽 पौड़ खोरे 

पौड़ खोरे मुळा नदीच्या उगमा पासून काही आंतरा पर्यन्तच्या तिच्या खोऱ्यात वसले आहे

पौड़ खोऱ्यातील गावची संख्या आहे ८२ 
ह्या खोऱ्याचे मुख्य ठिकाण होते 
"पौड़" पौड़ खोऱ्यात घनगड़ आणी कोरीगड़ हे दोन किल्ले येतात 

पौड़ खोऱ्याची देशमुखी होती 
ढमाले आणी त्यांचा किताब होता "राऊतराव"

(९)👉🏽 पवन मावळ

पवन मावळ पवना नदीच्या खोऱ्यात वसले आहे पवना नदी पुढे मुळा आनी भीमा नदीला मिळते 

पवन मावळाच्या दोन तरफा आहेत.
त्यापैकी शिंदे तरफेची देशमुखी शिंदेकडे होती तिच्यात ३७ गावे आहेत 
आणी घारे तरफेची देशमुखी ही घाऱ्यान असून तिच्यात ४३ गावे आहेत.

ह्या मावळचे मुख्य ठिकाण सांगता येत नाही.

पवन मावळची देशमुखी ही दोन घराण्यांकडे आहे 

शिंदे देशमुखांचा विसिस्ट असा किताब होता की नाही माहीत नाही 

दूसरे देशमुख घारे ह्यांचा किताब होता "भोपतराव"

(१०) 👉🏽 नाणे मावळ

इंद्रायणी नदीच्या उगमापासून काही आंतरा पर्यन्तच्या तीच्या खोऱ्यात नाणे मावळ् वसले आहे. इंद्रायणी पुढे भीमा नदीला मिळते

नाणे मावळात ८१ गावांची संख्या आहे.
नाणे मावळात लोहगड़, विसापुर, व् राजमाची हे किल्ले नाणे मावळात येतात.

ह्या मावळाचे मुख्य ठिकाण हे नाणे हेच नाणे मावळच्या नावावरून आहे.

ह्या मावळ् चे देशमुखी ही गरुड़ व दळवी या घरान्याकड़े होती 

(११) 👉🏽 खेडबारे

खेड़बारे हे शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.
ही नदी सिहंगडच्या दक्षिणेस उगम पावते आणी सध्याच्या पुणे-सातारा रस्त्याच्या पछिमेस् त्या रसत्याला साधारणपणे समांतर अशी वाहत पुढे गुंजवणी नदीस मिळते गुंजवणी पुढे नीरा नदीस मिळते.

खेड़बरे मावळातील गावांची संख्या आहे ४२
ह्या मावळाचे मुख्य ठिकाण आहे खेड सिहंगड़ किल्ला हां किल्ला खेड़बारच्या तरफेत येतो
खेड़बारे ची देशमुख आहे कोंडे
ह्यांना पण "इतबारराव" असा किताब होता 

(१२) 👉🏽 कर्यात मावळ

कर्यात मावळ ही पुणे परगण्याची एक तरफ होती.
कर्यात मावळ म्हणजे मावळाची गावे, मावळातील खेड़ी ती खेड़ी मिळून बनलेला उपविभाग म्हणजे तरफ कर्यात मावळ्.
या मावळाला स्वताचे असे काही नाव नाही. 

कर्यात मावळात ३६ गावे होती त्यापैकी १८ गावाची देशमुखी करंजावणे घरान्याकडे होती आणी
१८ गावची देशमुखी पायगुडे घरान्याकडे होती 

करंजावणे देशमुखांचा किताब "भालेराव" असा होता आणी

पायगुडे देशमुखांचा किताब "रवीराव"असा होता....

संदर्भ:
१)राजवाड़े खंड 
२)सरदेसाई खंड आणी
३)राजा शिवछत्रपती

लेखन श्री नवनाथ पायगुडे
।।बारा मावळ।।
जय शिवराय ⛳

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४