शहाजी महाराज
निजामशाहीची सूत्र हातात घेतली.
बादशाह (बहादुर निज़ामशाह) मृत्यु नंतर शके १५४१ म्हणजेच इ.स. १५९९ मध्ये पादशहाची दोन मुले होती.
एक 8वर्षें व एक 6 वर्षें ही मुल लहान असल्याने मुलांची आई बेगम साहिबा ने कारभारी कोण करावा या बाबत सर्व मनसबदार बोलावून विचाराणा केली. त्या वेळी शाबाजी अनंत ज्यांस त्याकाळी चतुर संबोधले जात होत.
शहाजी राजे हे बुध्दिवान, शुर मर्द, द्रव्याढ्य आहेत सर्व गुणसंपन्न आहेत त्यांना वज़ीराची वस्त्रे द्यावीत ते निज़ामशाही(पातशाही) जतन करतील असे शाबाजी अनंत यांनी बेगम साहेबांना सुचवले आणि संपूर्ण दरबाराची मान्यता सुद्धा मिळाली.
बेगम साहिबा यांनी फ़ार उत्तम म्हणून हेच कर्तव्य सिध्दांत करून म्हणून शहाजी राजे यांना वज़ीराची वस्त्रे व सन्मान देवून. पादशहाजादे मुर्तज़ा निज़ाम शाह यांस शहाजी राजे यांचे मांडीवर बसवले. निजामशाही ची सर्व सूत्रे त्यांच्या हातात दिली.
यानंतर शहाजींनी महाराज या नावाने निजामशाही चा कारभार पत्रव्यवहारात महाराज असे उल्लेख मिळतात.
या नंतर शहाजी राजे सर्व पादशाही दौलतीचा कारभार शबाजी चतुर व बेगम यांचे अनुमतीने चालवू लागले व राजे हा कीताब होताच तो ‘महाराज’ म्हणून पत्रव्यवहार करू लागले.
परंतु या वाढत्या लोकप्रियतेमुळे, अधिकारामुळे शाहजी राजांचा द्वेष चालू झाला. कारण फक्त एवढंच की शहाजी राजे हिंदू आहेत. त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचणे चे डाव मांडले गेले. परंतु थांबतील शहाजीराजे नाही नाही...
परंतू राजकारणास्तव हिंदू असणारे शहाजीराजे वजीरीची वस्त्रे घेवून महाराजा बनला आहे हे मुस्लिम सरदार व आदिलशाह तसेच मुघलांना न अतिशय झोबल होत.
मलिक अंबर यांचा मृत्यु शके १५४८ म्हणजेच इ.स.१६२६ मध्ये झाला होता.याचं कालखंडात शहाजी महाराज व शबाजी चतुर यांचेच वर्चस्व होते हे वर्चस्व मलिकअंबर यांचा मुलगा फत्तेखान याला सहन न झाल्याने स्वत:ला वजिरी मिळावी या हेतूने जाधवराव मंडळींच्या पुर्ववैमनस्याचा फ़ायदा घेत शहाजी महाराज यांचे विरोधात कटकारस्थान सुरू केले.
शहाजी महाराज यांना सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्यांनी गौरवण्यात आले होते.
अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या यावेळी शाहजहानने 1636 साली निज़ामशाही खालसा केली या मध्ये शहाजी महाराजांनी आदिलशाही स्विकारली त्या मुळे त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्यांनी गौरवण्यात आले होते.
सोबतच पुणे -सुपे ही जहांगीरी ही तशीच ठेवण्यात आली पुढे शहाजी महाराजांनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले.
त्यामुळे इ.स.1637 साली महंमद आदिलशहाने कर्नाटकात जहांगीरी देवून शहाजी महाराजांची कर्नाटक मध्ये रवानगी केली. त्यांचा मूळ उद्देश म्हणजे या मराठी माणसांपासून शहाजी महाराजांना तोडणे हा असावं. शहाजी महाराजांचा मराठा संघटन वर्चस्व या शाह्यांना पचनी पडलं नाही.
तेथे त्यांनी पेनुकोंडे, बसवपट्टनम्, होपेस्ट,बिदनूर,श्रीरंगपट्टनम व इतर ठीकानच्या पाळेगारंविरूध्द मोहीमा आखून तो प्रदेश आदिलशाही मध्ये आणला.म्हणूनच शहाजी महाराजांना इ.स. १६४८ मध्ये बेंगलोर ची जहागीरी व ‘महाराज’ सोबत ‘महाराज फर्जंद’ हा कीताब देण्यात आला नव्हे तो त्यांनी शौर्याच्या बळावरती मिळवला.
याचा उल्लेख ‘ऐतिहासिक फ़ारसी साहित्य खंड१ लेखांक१९’ मधील फ़ारसी पत्रलेखनात आहे.
👉ज्या प्रमाणे छत्रपती हा विशेष कीताब शिवाजी महाराजांनंतर ही चालत राहीला त्याच प्रमाणे ‘महाराज’हा 'किताब शहाजीराजे नंतर हा ही कीताब आजही छत्रपती घराने आदराने बाळगत आहे.
Comments
Post a Comment