राजनितीतज्ञ शहाजी महाराज
सन 1594मध्ये 15मार्च या दिवशी शहाजीराजे भोसले याचा जन्म सिंदखेड गावी झाला.वडील मालोजी आणि उमाबाई यांनी नगरच्या शहाशरीफ पिराला केलेल्या नवसा मूळ शहाजी असं नाव ठेवलं असं इतिहास वाचायला आयकायला मिळतो.
बाबाजी याच्या भोसले कुटूंबात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला.
बाळ शहाजीच शिक्षण चालू झालं. खेळण्या बाघडण्याचे दिवस आनंदात चलाले असताना. भोसले कुटुंबावर मोठे संकट ओढवले. मालोजीराजे याच्या ईदापूर येते झालेल्या युद्धामध्ये मालोजीराजे यांना वीरगती प्राप्त झाली.पुढे निजमाशाहीने मालोजीचा मोकासा पुढे चालू ठेवला. तो शहाजी महाराज याच्या नावे.पराक्रमाचा वारसा, त्याग आणि धैर्य जणू भोसले यांच्या रक्तामध्ये असलेले गुण.
बाळ शहाजी अवघे दहा वर्षाचे होते. जन्मापासून दहा वर्षापर्यंत मालोजीच्या प्रेमाची अनुभूती लहान शहाजीना होती. परंतु अवघ्या दहा वर्षात नियतीन बाळशहाजी बापाच्या छत्र हरवल होत.
वडिलांच्या मृत्यूनंतर मनसबदारी व जहागिरी कारभार आता कोवळ्या शहाजी वर आली होती.. आणि तेवढ्याच हिमतीने आईच्या साथीने शहाजी महाराजांनी जबाबदारी उचलून पेलू लागले.
शहाजी महाराज अल्पवयीन असल्यामुळे त्याचा सांभाळ व त्याच्या जहागीरची जबादारी चुलते विठोजीराजे करत होते.पुणे व सुपे जहागिरीचा कारभार शहाजी महाराज यांच्या नावे त्यांचे चुलते विठोजी करू लागले.
महाराजांवरती त्यांचा खूप जीव होता. शहाजी महाराजांच्या पालन-पोषण यामध्ये, शिक्षण विद्या मध्ये कोणत्याही प्रकारची कमी कधीच कमी पडू दिले नाही.
घरतील सर्व मुलं मोठी होत होती शहाजी महाराज 13वर्षाचे झाले होते.त्याच्या लग्नचे पाहण्यासाठी सुरवात झाली.शहाजी राजे दिसायला बानेदार, रुबाबदार,देखणे होते. राजे शस्त्र व शास्त्र पारंगत आता झाले होते. राजकारण,मुसद्दीपणा,पराक्रम राजे तरबेज झाले होते.कमी वयात राजकारणात प्रवेश झाला त्यामुळे राजांना खूप गोष्टी लवकर आत्मसात केल्या..
विठुजी भोसल्यांनी सिंदखेडच्या लखुजी जाधव याच्या कन्या जिजाबाई व शहाजी याच्या लग्नाची बोलणी लावली.
सिंदखेडचे लखुजी जाधवांची मुलगी जिजाबाई चा विवाह शहाजी महाराजांच्या बरोबर ठरला. सिंदखेडच्या जाधव याच्याशी भोसले यांचे संबंध व्हावेत अशी इच्छा मालोजी राजे यांची होती आता पूर्ण झाली होती.
सन 1605साली दौलताबाद येते लग्न सोहळा पार पार पडला.भोसले व जाधव खऱ्या अर्थाने आप्त झाले होते.
शहाजी महाराज व जिजाबाई याच्या वास्तव्य होते. पुढे पुणे,कोडाणा, शिवनेरी येते वास्तव्य करून जहागिरी ची व्यवस्था पाहत होते.
त्याना ऐकून सहा अपत्य होती. नियतीने त्याची ऐकून चार अपत्य हिसकावून घेतली. त्यामध्ये सांभाजी व शिवाजी ही दोन मुलं मोठी होत होती.एका युद्धामध्ये सांभाजी सुद्धा शौर्य गाजवून अभिमान्य सारखं सोडुन गेले.एवढी दुःखा मागवून दुःख येते असताना. बाल शिवाजी हळू हळू मोठे होत होते.
स्वतःचा धर्म व मानवता या निती मूल्यांना मूठमाती देणाऱ्या मुस्लिम साम्राज्याला शहाजीराजेचा सुरुवातीपासूनच विरोध होताच. जिजाऊणा बोलताना महाराज शहाजी महाराज कधी कधी बोलून दाखवत असावेत.बालशिवाजी सुद्धा हे ऐकत असावेत.
शहाजी महाराजांना आपले स्वराज्य निर्माण करायच होत. पण त्या वेळी जो सुलतानशाहीचा संघर्ष यामधून ते त्यावेळी अनुकूल नव्हतं.
नर्मदानदी ते हिंदमहासागरादरम्यानच्या विशाल भूखंडावर वैभवशाली, भव्य मराठा स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगन उभी हयात परकीय शक्तींना पायदळी तुडवणारे स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांची कारकीर्द दिव्य आहेच.
ईतीहासाची कागदपत्रे चाळली असता निजामशाही व आदिलशाही मध्येप्रमुख राजकीय घडामोडीमध्ये शहाजी महाराज याच्या शौर्य ठळक दिसत....
शहाजी महाराज महाराजांच्या जन्मतारखेबद्दल
इतिहासकारांत मतभेद आहेत.
विठोजीच्या मृत्यूनंतर शहाजी जहागीरचा कारभार पाहू लागले..
आदिलशाही, निजामशाही,मुघल वेळोवेळी शहाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला.शहाजी महाराज हे स्वतः एक महत्वकांशी मराठा सरदार होते.
मराठे सरदार व मराठा मुलुख आप आपसात लडुन ताकद खर्ची करण्या पेक्षा एकत्र येऊन यवनाना आपण अन्याया विरुद्ध लढा दिला तर आपण स्वराज्य निर्माण करू शकतो असा विश्वास शहाजी महाराज यांना होता.त्यानी एक नाही दोन नाही तब्बल दोन वेळा शहाजी महाराजांनी स्वतःच राज्य निर्माण केला पण दोन्ही वेळा गणित थोडकयात फीसकटल..
परकीयाच्या गुलमा गिरीतुन स्वतंत्र होऊन स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं ते स्वराज्य संकल्पना त्यानी अमलात अनन्यासाठी खूप प्रयत्न केला.
जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. सोळाव्या शतकाच्या आरंभी दख्खनमध्ये सर्वात मराठे सरदारांमध्ये शहाजी महाराज आदिलशाही निजामशाही मुगल या परकीय सत्तांशी त्यांचा संघर्ष वेळोवेळी झाला. संपूर्ण आयुष्यात लढतच आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा आता दूरवर पसरत होत्या.
शहाजी राजे यांचे कारकीर्दित फर्जंद हा बहूमुल्य किताब शहाजी राजे भोसले यांना मिळाला होता.
लेख अपूर्ण आहे. क्रमश
©®लेखक :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment