८ मार्च १६७० किल्ले पुरांदाराची किल्ली म्हणजे किल्ले वज्रगड.

८ मार्च १६७० किल्ले पुरांदाराची किल्ली म्हणजे किल्ले वज्रगड..

पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला गड फत्ते झाला....
ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला...

इकडे तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ति तारीख होती १२ एप्रिल १६६५....

पडलेल्या बुरुजामुळे दिलेरखानाला विजयोन्माद चढला आणि त्याने पठाणांना वज्रगड वर चढून जाण्याची आज्ञा केली. पण मराठे देखील चिवट त्ये थोडी लगेच हार माणनारं हातघाईची लढाई जुंपली ३०० मावळ्यांनी किल्ला भांडता ठेवला. सायंकाळ झाली मराठ्यांचे बळ अपुरे पडू लागले त्यामुळे बुरुज सोडून ते आतील कोटात गेले बुधवार मावळला. मराठ्यांचा कोटाच्या आतून चिवट प्रतिकार तरीही सुरूच यात मराठ्यांनी दिलेरचे ८० सैनिक मारले व ११० सैनिक जखमी झाले अखेर आवसान संपले तेव्हा मराठ्यांनी शस्त्रे खाली ठेवली आणि मिर्झा राजांनीही त्यांना अभयाचा कौल दिला...

शेवट शुक्रवार १४ एप्रिल १६६५ वज्रगड मराठ्यांनी मोगलांच्या हवाली केला.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४