श्री जोतिबा मंदिर कोल्हापूरचा देवाचा मानाचा घोडा ( आश्व ) देवा घरी गेला आहे.भावपूर्व श्रद्धांजली
देवाच्या सेवेत असणारा उन्मेष अश्वाचे निधन झाले. दोन दिवसापासून तापाने आजारी असलेल्या देवसेवक अश्वाने आज, बुधवारी दुपारी ४ वाजता प्राण सोडला. देवाच्या सेवेत असणाऱ्या अश्वाच्या निधनाची बातमी समजताच भाविक व पुजाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अश्वाची मंदिर परिसरातून ट्रॉलीतून अत्यंयात्रा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी उन्मेष' अश्वाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.गेली १० वर्षे जोतिबाच्या सेवेत उन्मेष अश्व होता. जोतिबाची पालखी, धुपारती सोहळाच्या पुढे असणारा उन्मेष आता दिसणार नाही. प्रत्येक शनिवारी दुपारी १२ ते ३ पर्यंत देवाच्या समोर उभा रहात होता.
पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असणाऱ्या ज्योतिबाच्या कथा अनेकांनी वाचल्या असतील.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे उंट, घोडा या मानाच्या प्राण्यांना पावसाळ्यात चार महिने थंडी, वारे, धुके यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते ता. (पन्हाळा )या गावात ठेवले जाते. या प्राण्यासाठी येथे पूर्वीपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने थटी नावाची इमारत बांधली आहे
यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीने कायमस्वरूपी दोन कर्मचारी नेमले आहेत. या प्राण्यांना जोतिबा पोहाळे परिसरात गवताची पाच कुरणे असून याठिकाणी येथील चारा घातला जातो. पूर्वापार चालत आलेल्या पध्दती नूसार याला पोहाळे गावी येण्याची प्रथा आहे.
गेल्या दहा वर्षापासून उन्मेष नावाचा अश्व दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या सेवेत होता. आज त्याचे हृदविकाराच्या झटक्याने जोतिबा डोंगरावर निधन झाले. दिसायला पांढरा शुभ्र आणि देखणा दिसणाऱ्या या अश्वाचे निधन झाल्यामुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment