३१ मार्च इ.स.१६६५**(चैत्र वद्य दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार)*आजचे इतिहास दिन विशेष

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*३१ मार्च इ.स.१६६५*
*(चैत्र वद्य दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार)*
दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला 
           जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना ह्या किल्ल्याकडे पाठविल्या. त्या आसपासच्या मुलुखात स्वाऱ्या, जाळपोळ व लुटालूट करू लागल्या.

*३१ मार्च इ.स.१६७६*
शिवरायांचे जावळीचा देशाधिकारी आबाजी मोरदेव यास रामदासस्वामींबद्दल पत्र
दि. ३१ मार्च १६७६ रोजी, म्हणजेच राज्याभिषेकच्या दुसऱ्या शकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जावळी प्रांताचा देशाधिकारी आबाजी मोरदेव याला आज्ञा केली. काय ? तर कसबे चाफळ येथील श्री रघुनाथाचे देवस्थान, कसबे नाणेघोळ आणि कसबे कराड येथील देवालये येथील नित्य पूजा आणि तिथल्या देवाच्या सेवकांना वेतन तसेच श्री रामदासस्वामी जिथे कुठे असतील, त्यांच्या सोबत जो शिष्यसमुदाय असेल त्यांच्यासाठी नुकतीच सनद सादर केली आहे (हि चाफळची जुनी, पहिली सनद होय). समर्थांच्या चाफळच्या देवस्थानाबद्दल, अन्नछत्र आणि भक्तसमुदायाकरिता प्रतिवर्षी ६० खंडी तांदूळ व ६१ खंडी नागली म्हणजे नाचणी देत जाणे असं म्हणून तिथल्या सुभेदारांना आज्ञा केली होती. श्री रामदासस्वामी शिवथर असता या सनदेप्रमाणे पावतच होते.

*३१ मार्च इ.स.१६८३*
*(चैत्र शुद्ध चतुर्दशी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार शनिवार)*
राहुल्लाखान बहादुरखानास मिळाला.
          बहादुरखानाचा पराभव होतो आहे असे समजताच राहुल्लाखान बहादुरखानास मिळण्यास निघाले. राहुल्लाखान जवळ भरपूर सैन्य असल्याने त्याने पुर्ण अंदाज घेऊनच मराठ्यांवर हल्ला केला. मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे मोगली सैन्य टिकाव धरू शकत नसल्याचे कळल्यामुळे संतप्त बादशहाने राहुल्लाखास नाशिकला पाठविले. मात्र कल्याण-भिवंडीच्या मोहीमेत छत्रपती संभाजी महाराजांनी बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडवून बादशाही मोहीम झुगारून टाकून त्याचे मनसुबे उधळले.

*३१ मार्च इ.स.१६८३*
*(चैत्र शुद्ध चतुर्दशी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार शनिवार)*
पेडगावला मराठ्यांचा धुमाकूळ!
        मोगल सेना औरंगजेबाच्या का होईना जागोजागी लढत होती. मराठ्यांनी तर यल्गारच मांडला होता. मराठे पेडगावात धुमाकूळ घालत पुढे चाल करून येत असल्याची बातमी मोगलांना मिळाली. मोगलांची फार वाताहात या युद्धात झाली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा मोगलांना सराव नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर आपला टिकाव लागत नाही याची जाणीव मोगल सरदारांना आता होत होती. अवघ्या ३ वर्षातच मोगलांना कळून चुकले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे.

*३१ मार्च इ.स.१६८६*
*(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार बुधवार)*
इंग्रजांचे पत्र!
           छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा कावा फार आधीच ओळखला होता. इंग्रजांचा सतत प्रयत्न होता की, त्यांचे चलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालावे, परंतु महाराजांनी सतत या प्रश्नाला बगल दिली. किमान छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तरी आपले चलन रहावे याचा आटापिटा इंग्रज करीत होते. त्याचसाठी इंग्रजांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. मुंबई व सुरतेला पत्रे आली, त्याचा मजकूर "मुंबईत आपली टांकसाळ असावी, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात आपले चलन चालावे याकरिता छत्रपती संभाजी महाराजांना गोड बोलून मदत करत रहावी". अशा आशयाचा होता. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी या मुत्सद्देगिरीला केराची टोपली दाखवली. हे पत्र आजही इतिहासात उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.

*३१ मार्च इ.स.१७४३*
सन १७४३ च्या फेब्रुवारी महिन्याचे प्रारंभी पेशवे पन्नास हजार फौजेनिशी बिहार प्रांतात दाखल झाले. पुढे पेशवे कूच करून मुर्शिदाबादेस निघाले. रघूजीनी बरद्वान परगणा ताब्यात घेऊन कटवा येथे सैन्याची छावणी केली. पेशव्यांनी तारीख ३१ मार्च १७४३ रोजी तुकोजी पवार, शिंदे, होळकर, जाधव इत्यादि सरदारांसह अलिवर्दीखानाची भेट घेतली. पेशवे व नबाब यांच्या भेटीत असे ठरले की, नबाबाने शाहू महाराजांस चौथाई द्यावी आणि पेशव्यास सैन्याचे खर्चाबद्दल बावीस लाख रुपये द्यावेत. रघूजी भोसल्यांनी बंगाल प्रांतावर स्वारी करू नये. याविषयी पेशव्यांनी रघूजी भोसल्यांशी करार करून बंदोबस्त करावा. पुढे नबाब व पेशवे आपल्या सर्व सैन्यानिशी रघूजी भोसल्यांवर चाल करून गेले. मराठे घोडदळापुढे नबाबाचे घोडेस्वारांचा टिकाव लागला नाही.

*३१ मार्च इ.स.१७४४*
भास्कर राम आपल्या २१ सेनानींसोबत "मानकरा" मैदानात आले. भास्कररामाने बंगाल वर इ.स.१७४४ मध्ये तिसरी स्वारी केली. अलीवर्दीखान त्यामुळे हताश झाला. पेशव्यांना दिलेले पैसे वाया गेले होते. यावेळी मात्र त्याने एक नवा डाव खेळण्याचे ठरविले. त्याचा प्रमुख अफगाण सेनापती गुलाम मुस्तफाखान यांच्याशी सल्लामसलत करून नबाबाने मराठी विरांविरुद्ध एक कट रचला, मराठ्यांना मित्रत्वाच्या नात्याने बोलावून त्यांची कत्तल करण्याची ही योजना गुप्तपणे तयार झाली. चर्चमध्ये जी रक्कम ठरेल ती देण्यास नबाब उत्सुक असून मराठे येऊन नबाबास भेटतील तर लागलीच रक्कम अदा केली जाईल असे आश्वासन नबाबाच्या लोकांनी मराठ्यांना दिले. विश्वासघात होणार नाही याचे आश्वासन मिळाल्याने भास्कर रामाने नबाबाकडे येण्याचे कबूल केले. भेटीचा मुहूर्तही ठरला. भेटीसाठी "मानकरा" मैदान ठरविण्यात आले. भास्कर राम आपल्या २१ सेनांनींसोबत "मानकरा" मैदानात आले. जानकीराम आणि मुस्तफाखान यांनी त्यांचे स्वागत केले. मराठ्यांना खास सजविलेल्या तंबूत रुजामे पसरले होते. मराठ्यांची सरबराई चालू असतानाच इशारा झाल्यावर तंबूच्या भोवती जमलेल्या नबाबाच्या सैनिकांनी मराठ्यांवर हल्ला चढवून २२ मराठी विरांना दगलबाजीने ठार केले. मराठी सैन्याने माघार घेतली. नबाबाने सैन्यात १० लाखांची खैरात केली. सर्व अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या. बंगालमध्ये मात्र आजही भास्कर रामाचा धाक आहे. लहान मुल रडायला लागले तर आया त्यांना दम देतात की, रडायचे थांबा नाही तर भास्कर पंडीत येऊन तुला घेऊन जाईल.


*३१ मार्च इ.स.१८५८*
तात्या टोपे लक्ष्मीबाई राणीच्या मदतीला ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments