जोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना ।जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ।।या अभंग रचणेच्या माध्यमातून तुकाराम महाराज जंवर याच्या कॉलर ला हात घालून अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा,कारस्थानांना भोंगळं करनारा जिगरबाज भेटत नाय तंवरच ! या भपक लोकांची बडाई ऐकायची असते अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा एक दिवस येतोच..
...आवो यांचा घमंड माज कुठवर? जंवर याचा कॉलर ला हात घालून यांच्या कारस्थानांना भोंगळं करनारा जिगरबाज भेटत नाय तंवर ! म्हनूनच तुकोबारायानं म्हन्लंय :
जोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ।।
जोंवरि तोंवरि सिंधू करि गर्जना ।
जंव त्या अगस्तिब्राह्मणा देखिलें नाहीं ।।
जोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ।।
जोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी ।
जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ।।
जोंवरि तोंवरि माळामुद्रांची भूषणें ।
जंव तुकयाचें दर्शन जालें नाहीं ।।
...जंबुक म्हणजे कोल्हा ! ह्या कोल्ह्याची कुईकुई तोवरच चालते, जोवर त्याने पंचानन म्हणजे सिंह बघितला नाही.
...सिंधू म्हणजे समुद्र ! समुद्र तोवरच गर्जना करतो जोवर त्याने अगस्ती ॠषी पाहिला नाही.
...वैराग्याच्या गोष्टी तोवरच चालतात, जोवर सुंदर स्त्री नजरेला पडली नाही.
..शौर्याच्या,मर्दुमकीच्या बाता तोवरच चालतात, जोवर परमाईचा पुत्र म्हणजे दूसर्या माईचा लाल - खराखुरा शूर, योद्धा समोर आला नाही.
...माळामुद्रांची भूषणें तोवरच मिरवा बेट्याहो, जोवर तुम्हाला तुकारामाचं दर्शन झालं नाही !
साधा नव्हता हो त्यो. "तुमचा माजोरडेपना तुमच्या घरी..माझ्यापुढं येऊन नाद करायचा माझा."
...कोल्ह्यानं त्याच्या एरीयात कितीबी खच्चून कोल्हेकुई करूद्यात. सिंह समोर आला की त्याची बोबडी वळती.. अगस्ती ऋषीनं तीन घोटांत आख्खा समुद्र पिऊन टाकला अशी काल्पनिक का हुईना कथा हाय. म्हनून समुद्रानंबी आपल्या अथांग असन्याचा गर्व करू नये...
...तुकोबारायानं स्वत:चा जबराट जिगरा दाखवत असे अनेक पोकळ अध अभिमानी उघडे पाडलेत भावांनो.
ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल
साभार
- किरण माने.
Comments
Post a Comment