जागतिक महिला दीना निमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दी मधील *महाराजांचे स्त्रियांविषयी धोरण* अपरिचित ऐतिहासिक प्रसंग आपण जाणून घेणार आहोत.छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रीयांबद्दल जागरूक आणि संवेदनशील होते. शिवरायांना स्त्री वर्गाबद्दल आदर होता मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो. स्वराज्यात स्त्रीयांना देवीचे स्थान होते.आपणस दक्षिण दिग्विजय मोहीम माहिती आहे. परंतु याच दरम्यान घडलेला एक अपरिचित इतिहास अनेक लोकांना माहीत नसावा. तो आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ऐकत आहे दक्षिण दिग्विजय वेळेची. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयी आदर या प्रसंगावरून व्यक्त होतो.
झालं असं छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेत पूर्ण करून परतताना *बेलवडी* या गावातील एक छोटीशी गढी छत्रपती शिवजी महाराजांच्या नजरेत आली.
त्यांनी लगेच सैनिकांना गढी जिंकून स्वराज्यात घेण्याचा आदेश केला.
ती गढी ईशप्रभू देसाई यांची होती.
ते मराठ्यांच्याविरूध्द लढताना मृत्यूमुखी पडले होते. परंतू त्यांच्या मृत्यूपश्चात गढीचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नी मल्लम्मा देसाई या रणांगणात उतरल्या त्यांनी मराठ्यांच्या विरोधात मोठा संघर्ष केला.
👉 तब्बल एक महिना हा संघर्ष चालू होता.
जवळपास एक महिना हि लढाई चालू होती. शेवटी मराठा सैनिकांनी गढी जिंकली व मल्लम्माला बंदी केले व शिवरायांसमोर हजर केले.
👉 छत्रपती शिवाजी महाराजांचे महिलांविषयी धोरण जग प्रसिद्ध आहेच. कल्याणची सुभेदाराची सून महाराजांनी आदरपूर्वक साडी चोरी करून परत पाठवली. हा इतिहास परिचयाचा आहे.
परंतु इतिहासामध्ये अनेक अशी अनेक उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अगदी ठळक करतात.त्यापैकीच एक असा उदाहरण खाली आपण पाहणार आहोत.
👉शिवरायांना पहिल्यापासूनच महिलांविषयी आदर व सन्मान होताच.
त्यांना मल्लम्मांच्या पराक्रमाची बातमी कळताच त्यांनी मल्लम्माला बंदीमुक्त करण्याचा आदेश दिला.
👉 तसेच मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली तिच्या अल्पवयीन मुलाला अभय दिले एवढेच नाही तर तिच्या या शूर कार्यामुळे तिला 'सावित्री' हा किताब दिला.
👉 छत्रपती शिवरायांकडून मिळालेल्या एवढ्या मोठ्या सन्मानाने मल्लम्मा भारावून गेली तिला गहिवरून आले होते.
👉 तिने आपल्या जहागिरीतील यादवाड येथे शिवरायांचे अश्वारूढ दगडी शिल्प कोरून घेऊन शिवरायांचे मंदिर उभारले.
हे मंदिर आजही आपणास पाहायला मिळते.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रीयांबद्दल जागरूक आणि संवेदनशील होते. शिवरायांना स्त्री वर्गाबद्दल आदर होता मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो. स्वराज्यात स्त्रीयांना देवीचे स्थान होते. या प्रसंगावरून स्पष्ट होते. इतिहासामध्ये अनेक उदाहरणे असावेत परंतु इतिहासाची साधने अपुरी पडतात.
👉फोटो - मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई ईशप्रभू देसाई यांनी बनवून घेतलेली छत्रपती शिवरायांची अश्वारूढ दगडात कोरलेली मूर्ती.
माहिती संकलन नितीन घाडगे
💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Comments
Post a Comment