मराठा साम्राज्य विस्तार : १७०७ ते १७१९.

मराठा साम्राज्य विस्तार : १७०७ ते १७१९.
_______________________________
पार्श्वभूमी  : 
.................
१७०७ च्या दरम्याने परिस्थितीच अशी झाली होती की  मराठ्यांच्या सततच्या आक्रमणामुळे मोगल त्रस्त झाले होते . अहमदाबादच्या संरक्षणासाठी नुकतीच मोठी खंडणी द्यावी लागली होती . छत्रपती शाहूंना कैदेत ठेऊन  धोका वाढू लागला होता .  दक्षिणेतही  मोगलांना सुरक्षा आवश्यक वाटू लागली होती . अशावेळी शाहूंशी मैत्रीपूर्ण संबंध हाच एकमेव मार्ग होता . मोगलांना  स्वतःच्या सुरेक्षेसाठी महाराज स्वतंत्र राहणे गरजेचे होते . शाहू मोगलांच्या प्रांतात आक्रमण करणार नाहीत आणि प्रसंगी मदतीला येतील  असा  भरवसा मोगलांना होता . अशा परस्पर समजुतीने शाहू महाराज महाराष्ट्रात आले .

तरीही प्रसंग कठीण होता . महाराजांच्या मातोश्री व बंधू मोगलांच्या ताब्यात होते . तरीही महाराजांनी  आक्रमक भूमिका घेतली  
यात त्यांची पूर्वतयारी दिसते . 

छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी १७०७ पासून लगेचच  हालचाली करून विस्ताराची वाट मोकळी करून दिली . दिशा मिळताच 
मराठा सरदारांनी सरस कामगिरी करून शाहूंचे धाडसी निर्णय यशस्वी केले . मराठा स्वराज्यावरील ही त्यांची निष्ठा होती .

खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक व माळवा स्वराज्यात आले . 

चौथ , सरदेशमुखी वसुलीस सुरुवात करून आर्थिक नियोजनास दिशा दिली .

तरीही बरेच लहान मोठे लेखक मराठा साम्राज्य विस्ताराबद्ल व त्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेविषयी बोलताना , 
याने पाठिंबा दिला , त्याने सहाय्य केले  अशी मांडणी करतात . पण वास्तव हे आहे की ,  कैदेत असतानाच छत्रपती शाहू महाराज प्रमुख मराठा सरदार व  राजपूत राजे यांचे संपर्कात होते .

महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर मेवाडचे महाराणा , सवाई जयसिंग व अजितसिंह यांनी एकत्र येऊन सवाई जयसिंगामार्फत पत्र लिहून त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती . त्यासाठी आपल्या पूर्वजांच्या एकमेकाशी असलेल्या स्नेहबंधांची आठवणही करून दिली . हा शाहूंबद्दलचा त्याचा आत्मविश्वास म्हणजे त्यांच्या समर्थ नेतृत्वाची कबुलीच आहे .

महाराष्ट्रात आल्यावर त्यांना येऊन मिळाले ते मराठा साम्राज्याचे निष्ठावंत राजसेवक होते . शाहूंचे नेतृत्व आणि सामर्थ्य जाणूनच ते शाहूंसोबत होते . वारसाहक्काने राज्य छत्रपती थोरले शाहू महाराज यांचेच होते .
शाहूंकडे जे आले त्यांच्या कर्तबगारीला राजाश्रय मिळाला . शाहूंचे नेतृत्व , आर्थिक पाठबळ , पूर्वनियोजित रणनीती याने जे आले त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला , ते यशस्वी झाले  .  राजाच्या सेवेतच राजाने दिलेल्या पदाच्या अधिकारात  कर्तृत्व उजाळले . 

शाहूंबद्दल अनेकांनी आशीही आवई उठवून दिलीय की त्यांनी बादशहाचे मांडलिकत्व मान्य केले होते . पण राज्यविस्तारासाठी केलेली व्यूहरचना पाहता त्यात काही तथ्य दिसत  नाहीय . छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मोगलांची पर्वा न करता साम्राज्य विस्तार केला हे निर्विवाद सत्य आहे . 

#मराठा_स्वराज्याचे_विस्ताराचे_जनक_छत्रपती_शाहु_महाराज# व इ सन १७१९ चा करार 

अ】
 इ सन १७१५-१६ या काळात सेनाखासखेल खंडेराव दाभाडे, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर, नेमाजी शिंदे व कान्होजी भोसले आदी मराठा सरदारांनी मोगलाचा दक्षिण सुभेदार सय्यद बंधुपासुन पुणे, माळवा व कर्नाटक  हे प्रांत पराक्रमाने जिंकुन घेतले... 

परिणामी सय्यदबंधुस शाहु महाराजांसोबत करार करणे भाग पडले. तसेच याच काळात दिल्लीत देखिल सय्यदबंधुस विरोध होत होता....

हा करार इ सन १७१८ साली झाला आणी तो खुद्द छत्रपती शाहु महाराज व सय्यद हुसेन यांच्यात झाला,  याची कलमे पुढील प्रमाणे..

१) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळेस स्वराज्यात असलेले सर्व प्रांत , तमाम गडकोटासह शाहुंच्या हवाली करावे.
२) सय्यद अलीकडुन मराठा सरदारानी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक व माळवा या भागातले नमुद केल्याप्रमाणे मोगलानी सोडुन देऊन मराठ्यंच्या स्वराज्यात सामील करावे.
३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखावर चौथ,व सरदेशमुखी हक्क मराठ्यानी स्वतः वसुल करावे,या चौथाईचे मोबदल्यात आपली १५,००० फौज मराठ्यानी बादशहाचे मदतीस ठेवावी आणी सरदेशमुखीच्या मोबदलात मोगलांच्या मुलुखात चोऱ्या वगैरेचा बंदोबस्त करावा.म्हणजे संरक्षण करावे.
४) कोल्हापुरच्या संभाजीस शाहुनी उपद्रव देऊ नये.
५) मराठ्यानी बादशहास दहा लाख रु खंडणी द्यावी.
६) शाहुंचे कुटुंब , बंधु मदनसिंह वगैरे दिल्लीच्या कब्जात आहेत त्याना मुक्त करुन स्वदेशी मराठ्यांच्या ताब्यात पावते करावे.

यात विशेष एक बाब अशी आहे की,या बाबतचे बादशहाचे लेखी फर्माण पुढे यायचे होते, शाहु महाराजानी मात्र हा तह , लगेच अमंलात आणण्यास सुरुवात केली.त्या संबंधीचे शाहु महाराजंचे हुकुम १ ऑगस्ट १७१८ चे उपलब्ध आहेत....

यावरुन छत्रपती शाहु महाराज बादशहाच्या या लेखी फर्मानास काय किंमत देत होते हेच सिद्ध होते....

तसेच कलम दुसरे , खुप महत्वाचे आहे... यात इ सन १७१५-१६ साली मराठा सरदारानी (खंडेराव दाभाडे,सुलतानजी निंबाळकर,कान्होजी भोसले, नेमाजी शिंदे आदी) जिंकलेले मोगल प्रदेश खानदेश,माळवा,पुणे ,गुजराथ व कर्नाटक हे मराठ्यांकडे ठेवावे...म्हणजे इ सन १७१५-१६ सालीच शाहु महाराजांच्या हुकुमाने मराठा सरदारानी मराठा स्वराज्याचा विस्तार चालु केला होता हेच सिद्ध होते.

दिल्ली दरबारात सय्यद अब्दुल्ला च्या विरोध्द बादशहाने त्याचा काटा काढण्यासाठी विविध कारस्थान रचली होती. बादशहाच्या या कारस्थानाना तोंड देण्याकरिता त्याने आपला भाऊ हुसेन यास दिल्लीत त्वरीत निघुन येण्यास २९ सप्टेंबर १७१८ रोजी कळवले. त्याप्रमाणे सय्यद हुसेन दिल्लीस जाण्यास औरंगबादेहुन नोव्हेंबर १७१८ मध्ये मराठ्यासह निघला.त्याच्याबरोबर स्वतःचे ८००० घोडेस्वार आणी 

मराठ्याकडील सेनापती खंडेराव दाभाडे याच्या नेत्रुत्वाखाली राघोजी शिंदे, प्रधान बाळाजी विश्वनाथ, संताजी भोसले, राणोजी भोसले,उदाजी चव्हाण, नारो शंकर, पिलाजीराव जाधवराव, केरोजी पवार, तुकोजी पवार, आदी प्रमुख सरदारासह आपल्या १६०००सैन्यासह हजर होते.हे मराठा सरदार व सैन्य छत्रपती शाहु महाराज यांच्या हुकुमानेच रवाना झाले होते. सय्यद बंधुस या मदतीच्या बदल्यात करार करवुन घेणे हे धोरण शाहु महाराजानी ठेवले होतै.....

त्याप्रमाणे दिल्लीत सय्यदबंधुस मराठा सैन्यानी मदत केली व तेथे दोन बादशहा बदलवुन तिसरा आपल्या मर्जीतला बादशहा सय्यदबंधु, शाहु महाराज व अजितसिंहाने बसवला, त्या बदल्यात मातुश्री येसुबाईसाहेब, दुर्गबाईसाहेब, जानकीबाईसाहेब व मदनसिंह व इतर राजकैदीची सुटका , तसेच करारावर शिक्कामोर्तब शाहु महाराजानी सय्यद बंधुसोबत सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेत्रुत्वाखाली सैन्य पाठवुन करवुन घेतले . यात वकिल यादव याने तेथे करारावर शिक्कामोर्तब करण्याचे व प्रधान बाळाजी विश्वनाथ यानी कागदपत्र दक्षिणेत आणण्याचे काम केले.

ब】 छत्रपती शाहु महाराज यानी मोगलांच्या आक्रमक चढाईस आळा घालण्यासाठी इ सन १७१५ च्या सुरुवातीसच खंडेराव दाभाडे, रायाजी प्रभु, राजजी थोरात याना गंगथडीच्या बाजुस मोगलावर पाठवले आणी त्यानी तेथे आक्रमण केले.

क】 २ एप्रील १७१५ रोजी शाहु महाराज यानी खंडेराव दाभाडे व कान्होजी भोसले याना ३०,००० सैन्यानिशी नर्मदा ओलांडुन माळव्यात घुसवले.तसेच आणखी मराठा सैन्य टोळी वढवाहजवळ नर्मदा उतरुन कंपेल परगण्यात घूसवली........येथे मोगल सरदार सवाई जयसिंह व मराठा सैन्य यांच्यात लढाई झाली....परंतु यात मराठा सैन्याचा पराभव झाला.जयसिंहाने या प्रांताची व्यवस्था लावली.परंतु ही व्यवस्था अल्पकाळच टिकली.

ड】माळवा मोहिमेनंतर खंडेराव दाभाडे,सुलतानजी निंबाळकर व दावलजी सोमवंशी याना खानदेश व गुजराथ प्रांतात शाहु महाराजानी पाठवले आणी खंडेराव दाभाडे यानी या दोन प्रांताचा दळणवळणाचा रस्ताच ताब्यात घेतला.तेव्हा हुसेन अलीने झुल्फिकारबेग या सरदारास खंडेराव दाभाडे विरोधात पाठवले.परंतु खंडेरावानी मोठ्या युक्तीने मोगलांचा पाठलाग करुन डोंगरी प्रदेशात झुल्फिकारबेगसह त्याची फौजच कापुन काढली. यासमयी त्यानी गुजराथवरील मोगलांचा अमंल काढुन शाहु महाराजांचा अमंल प्रस्थापीत केला. ही मोहिम जुन १७१५ सालची आहे.

ढ 】 पुण्यावरील मोगलांचा अमंल दुर केला =
एप्रील १७१६ साली शाहु महाराजानी मराठा सरदार खंडेराव दाभाडे व सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यास मोगलातर्फे पुण्याचा ठाणेदार रंभाजी निंबाळकर याच्यावर पाठवले. या सरदारानी रंभाजी निंबाळकराचा पराभव करुन त्याचा पर्यायाने मोगलाचा पुण्यावरील अमंल कायमचा दुर केला. यात रंभाजी निंबळाकर यांचा पुत्र जानोजी मारला गेला.

अशाप्रकारे पुण्यावर छत्रपती शाहु महाराज यानी खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर मार्फत ताबा मिळवला.

ण】अशाप्रकारे छत्रपती शाहु महाराज यानी आपल्या सरदारामार्फत मोगलचा दक्षिण सुभेदार हुसेन अली याची कोंडी केली आणी खानदेश, पुणे, गुजराथ, हैद्राबाद व कर्नाटक हे मोगलप्रांत आपल्या ताब्यात घेतले. या कोंडीमुळेच हा हुसेन अली शाहु महाराजांशी करार करण्यास तयार झाला. हा करार शाहु महाराजानी दक्षिणेतच करवुन घेतला व त्यावर बादशहाचे फर्मानासाठी दिल्लीत पाठवले.......

परंतु छत्रपती शाहु महाराज यानी बादशहाच्या फर्मानाची देखिल वाट न पाहता आपल्या सरदाराना करार अमंलबजावणीचे आदेश दिले...

यावरुन छत्रपती शाहु महाराज यांची धाडसी व्रुत्ती व मुत्सद्देगिरीपणा दिसुन येतो.....

तिकडे मातुश्री कैदेत आसताना देखिल शाहु महाराज बादशहाच्या फर्मानाची वाट न पाहता कराराची अमंलबजावणी करताना दिसतात........म्हणजे ते बादशहासास काय व किती किंमत देत होते हेच सिद्ध होते.......

त】
तसेच मराठा स्वराज्याचा विस्तार देखिल मोगल प्रांतातच करुन घेऊन मोगलासोबत करार करुनही मोगलासच शह देऊनच मराठा स्वराज्याचा विस्तार मराठा सरदारामार्फत करवुन घेत होते.म्हणजे बघा ज्याच्याशी करार करायचा त्याच्याच विरोधात जाऊन त्याच्याच प्रांतात मराठा स्वराज्याचा विस्तार करणे, म्हणजे शाहु महाराज यानी या कराराचा गनिमीकावा करुन राजकारणच केले.....यावरुन त्यांची राजकारणी व धुर्तपणा दिसुन येतो........वरती मोगलांच्या प्रांतात चौथ व सरदेशमुखी वसुली कुलबाबे (वंशपरंपरागत अधिकार) अशीच करत.......

#शाहु_पर्व# #जागर_इतिहासाचा#

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४