किल्ले गुणवंतगड किल्ले सातारा जिल्हा लॉग नंबर 23

गुणवंतगड

पाटणाहून चिपळूणकडे जाताना एक फाटा फुटतो, त्या फाट्याजवळून पश्चिम-नेऋत्य दिशेला १० किलोमीटर अंतरावर गेल्यास मोरगिरीचा प्रसिद्ध गुणवंतगड किल्ला आहे. पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला आहे. पश्चिम-वायव्य दिशेला दातेगड आहे.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.

१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.

सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे
संदर्भ :-
सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
किल्ले - गो. नी. दांडेकर
दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
सह्याद्री - स. आ. जोगळेकर
दुर्गकथा - निनाद बेडेकर
दुर्गवैभव - निनाद बेडेकर
इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४